करमाळा प्रतिनिधी करमाळा येेेथै भवानी पेठ येथील बाबु हमजेखान पठान व्यापारी संकुलातील व्यापारी गाळ्यांना काल रात्री १०वा.शाॅर्ट सर्किटने आग लागुन ४ते५ दुकानांना आग लागुन लाखो रूपयांचे नुकसान झाले.रात्री १०.३०च्या सुमारास शतपावली करणा-या शेजारील महिलांच्या आग लागल्याचे लक्ष्यात येताच महिलांनी कल्पना देऊन परीसर रीकामा केला.आगीच्या तिव्रतेने बाजुची चिंचेच्या व लिंबाच्या मोठ्या झाडांनिही पेट घेतला.प्रशासकिय कार्यालयांना याची माहिती मिळताच सदरील परीसर सिल करण्यात आला.यादरम्यान भवानी पेठेतील युवकांनी धाडसाने आग नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न केले.परीसरातील नागरीक..जनावरे ..यांना सुरक्षित स्थळी हलवले.आगीमुळे विज बंद केल्याने बोअरवेल चालु न शकल्याने यातच नगर परीषदेच्या नळांना पाणी न आल्याने आग विझवण्यासाठी युवकांची तारांबळ झाली.आणखीन खास बाब म्हणजे कित्येक फोन केल्यावर नगर परीषदेचा अग्निशामक बंब आला मात्र.यानंतर विहाळ येथील भैरवनाथ साखर कारखाण्याचा बंब घटणास्थळी दाखल झाल्यावर हि आग नियंत्रणात आली.यावेळी नगरसेवक अतुल फंड सचिन घोलप…केतन इंदुरे..सुनिल बनसुडे सागर राऊत.पत्रकार सचिन जव्हेरी.पिंटु इंदुरे…प्रकाश इंदुरे..बंटि दगडे..साहिल पठाण..आदिंनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.यादरम्यान करमाळ्याचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी हजर राहुन विशेष प्रयत्न केले.खुप नुकसान झाले असते…आगीची तिव्रता खुप होती…शेजारी माळवादाचा वाडा पेटलाच होता…दांड्या पेटल्या विझता विझेना …विझवल कि परत पेटायचं अशी भयानक परिस्थिती झाली होती.सुदैवाने पोलीस व तरुणाच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला आहे.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…