करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका सह .कृषी खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणुक नुकतीच बिनविरोध पार पडली . खरेदी विक्री संघाच्या चेअरमन, व्हा . चेअरमन निवडीसाठी दिलीप तिजोरे सहाय्यक निबंधक सह .संस्था तथा निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली . यावेळी चेअरमन पदासाठी जगताप गटाचे युवानेते शंभुराजे जगताप व व्हा . चेअरमन पदासाठी जनार्धन नलवडे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांच्या बिनविरोध निवडी जाहीर झाल्या . यावेळी संघाचे मार्गदर्शक संचालक माजी आमदार जयवंतराव जगताप, नूतन संचालक महादेव कामटे, महादेव डुबल,गोरख लबडे, रामदास गुंडगिरे, हनुमंत ढेरे, मज्जिद खान, शहाजी शिंगटे, सर्जेराव घरबुडवे, किशोर भगत, महेश कांबळे, सौ .नंदिनी जगताप, सौ .मनिषा धोंडे बैठकीस उपस्थित होते . खरेदी विक्री संघावर स्थापने पासून जगताप गटाचे वर्चस्व आहे . करमाळा तालुका खरेदी विक्री संघाची माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप यांनी स्थापना केली असून आजवर कै .नामदेवराव जगताप, माजी आमदार जयवंतराव जगताप, माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी चेअरमन पदाची धुरा सांभाळली आहे . आता जगताप गटाचे युवानेते शंभुराजे जगताप यांची चेअरमन पदी वर्णी लागल्यामुळे एप्रिल २०१९ मधे लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून आपल्या राजकीय जीवनाचा श्रीगणेशा करणाऱ्या शंभुराजे जगताप यांची आता या निमित्ताने सहकार क्षेत्रात राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली आहे . निवडी नंतर सहाय्यक निबंधक तिजोरे यांनी संघाला उर्जितावस्था आणणेचे दृष्टीने यथोचित मार्गदर्शन संचालक मंडळाला केले .*खरेदी -विक्री संघास गतवैभव प्राप्त करून देणार* :निवडीनंतर शंभुराजे जगताप यांनी खरेदी विक्री संघास गतवैभव प्राप्त करून देणार असून शेतकऱ्यांच्या सोयीसाठी खते बी बियाणे विक्री, खादी ग्रामोद्योग भांडार , केळी रायफनिंग सेंटर संघामार्फत सुरु करणार असल्याचे सांगीतले .