Categories: करमाळा

बार्शीत डॉ. कुन्ताताई नारायण जगदाळे ‘जीवन गौरव पुरस्कार २०२२-२३’ चे आयोजन… डॉ.श्रीमंत कोकाटे व जेष्ठ पत्रकार राजा माने यांची उपस्थिती

.

 

बार्शी, ०३ मार्च : डॉ. कर्मवीर मामासाहेब जगदाळे बहुद्देशीय संस्था ,बार्शी आयोजित डॉ. कुन्ताताई नारायण जगदाळे ‘जीवन गौरव पुरस्कार २०२२-२३’ , वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक ५ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता हा वितरण समारंभ संपन्न होणार आहे. कै. यशवंत चव्हाण ग्रंथालय हॉल, श्री शिवाजी कॉलेज कॅम्पस, बार्शी येथे हा सोहळा पार पडणार आहे. इतिहास तज्ज्ञ व विचारवंत डॉ.श्रीमंत कोकाटे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक राजा माने हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत.

बार्शी येथे रंगणाऱ्या या सोहळ्याचे उद्घाटन सुप्रसिद्ध वक्ता व इतिहास अभ्यासक डॉ. श्रीमंत कोकाटे यांच्या हस्ते संपंन्न होणार आहे. तसेच शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे जनरल सेक्रेटरी श्री प्रकाश पाटील , खजिनदार श्री जयकुमार शितोळे आणि जॉईंट सेक्रेटरी श्री अरुणजी देबडवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व गाजवणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जाणार आहे.

या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते नऊ क्षेत्रातील नऊ गुणवंतांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. या कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात आपले योगदान असणारे श्री शंकर उर्फ बापूसाहेब कोकाटे, कृषी क्षेत्रातील श्री तुळशीदास गव्हाणे , साहित्य क्षेत्रातील प्रा. डॉ. सुनील विभुते, बांधकाम उद्योजक क्षेत्रातील श्री प्रशांत पैकेकर, वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. श्री किशोर गोडगे, पत्रकारिता क्षेत्रातील श्री चंद्रकांत करडे, शैक्षणिक क्षेत्रातील श्री विजय भानवसे , कला क्षेत्रातील श्री मोहम्मद बागवान आणि क्रीडा क्षेत्रातील प्रा. डॉ. दत्तप्रसाद सोनटक्के आदी मान्यवर या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

21 hours ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

2 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

2 days ago