करमाळा प्रतिनिधी सुदृढ प्रकृतीसाठी व आनंदी जीवनासाठी निरोगी मन हे सर्वाधिक महत्त्वाचे असल्याचे मत करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक करमाळा केंद्र तसेच हॅप्पी हेल्थ हॅपी लाईफ मुंबई या संस्थेच्यावतीने स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या फ्रि फिटनेस कॅम्पच्या शिबिराच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमास अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे आश्रयदाते गंगाधर कुलकर्णी मकाईचे माजी संचालक विवेक येवले, आदिनाथचे माजी संचालक डॉक्टर वसंतराव पुंडे, एकलव्य आश्रम शाळेचे संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण माने आदी मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीस प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. करमाळा केंद्राचे अध्यक्ष संतोष कुलकर्णी यांनी उपस्थित असे स्वागत करून प्रास्तविक करून भाषणातून संस्थेच्या सामाजिक कार्याची रूपरेषा विशद केली. या शिबिराचे मार्गदर्शक राष्ट्रीय विक्रम महेश वैद्य यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी गंगाधर कुलकर्णी, सौ.भावना गांधी, रामकृष्ण माने, विवेक येवले किसन कांबळे यांची भाषणे झाली. यावेळी पुढे बोलताना गटविकास अधिकारी राऊत म्हणाले की आजच्या काळात माणसाचे मन व बुद्धी ही सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसत असलेल्या विविध प्रलोभनामध्ये गुंतून राहिलेली आहे अथवा गहाण पडलेली आहे असेच म्हणावे लागेल सोशल मीडिया व प्रसार माध्यमाच्या अतिरेकामुळे आजची तरुण पिढी ही जगण्याचा मूलमंत्रच हरवून बसलेली आहे या प्रकारामध्ये सध्याच्या पिढीमध्ये येणारे पिढया ह्या मनाने व शरीराने दुबळ्या होत जाणार असून त्याची अनिष्ट परिणाम आपल्या देशाला सर्वाधिक तऱ्हेने भोगावे लागणार आहेत. हे सर्व थांबवण्यासाठी व खऱ्या अर्थाने मन व शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी व्यापक अर्थाने सामाजिक पातळीवर प्रबोधन होणे गरजेचे आहे असे झाले तरच येणाऱ्या पिढी आहे सर्वार्थाने आनंदी जीवन जगू शकतील या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करमाळा केंद्राचे सचिव बाळासाहेब होशिंग यांनी तर सूत्रसंचालन नरेंद्रसिंह ठाकूर यांनी केले या कार्यक्रमास डॉक्टर तुषार गायकवाड विनोद गांधी विकास गांधी सचिन जव्हेरी सह महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम व शिबीर यशस्वी पार पाडण्यासाठी संस्थेचे रवींद्र विद्वत निलेश गंधे सागर कुलकर्णी शंकर कुलकर्णी तसेच सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले सात दिवस आयोजित याची बिराला महिला व नागरिकांचा मोठा प्रमाणात प्रतिसाद मिळाला.