करमाळा प्रतिनिधी
संपूर्ण महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्था मजबूत करून सर्वसामान्यांना मोफत उपचार देणे व राज्यातील एकही व्यक्ती उपचाराअभावी वंचित राहू नये ही भूमिका घेऊन काम करीत असलेले संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्था मजबूत होत आहे असे प्रतिपादन विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांनी केले. शिवसेना जिल्हाप्रमुख पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश नरसिंह चिवटे यांच्या वाढदिवसानिम्मित शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्यावतीने सुरू असलेल्या मोफत आरोग्य शिबिराच्या दुसऱ्या दिवशीच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते, यावेळी मुस्लिम समाजाचे अध्यक्ष कलीम काजी, आदिनाथचे संचालक प्रकाश पाटील, वस्ताद अजिनाथ कोळेकर, रंभापुरा शिवसेना शाखाप्रमुख निलेश चव्हाण, जेष्ठ पत्रकार नासिर कबीर, शिवसेनेचे युवा नेते गजराज चिवटे, वैद्यकीय कक्ष समन्वयक नागेश शेंडगे, प्रभारी अध्यक्ष रोहित वायबसे, तालुका समन्वयक दीपक पाटणे, हिवरवाडी शाखाप्रमुख आजिनाथ इरकर, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
शिबिराच्या पहिल्या दिवशी 517 रुग्णांची तपासणी करून जवळपास 372 लोकांना मोफत चष्म्याची वाटप करण्यात आले व सर्वांना मोफत औषधे देण्यात आली.
सोमवार दुसऱ्या दिवशी 670 रुग्णांनी नोंद केली असून रुग्णांची तपासणी करण्याचे काम 35 डॉक्टरांच्या माध्यमातून सुरू आहे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी शाल, श्रीफळ देऊन मुस्लिम समाजाचे अध्यक्ष कलीम काझी विलासराव घुमरे यांचा सत्कार केला
कलीम काझी मुस्लिम समाजाचे नेते
मुख्यमंत..एकनाथ शिंदे यांचे कामकाज सर्व धर्मातील लोकांना पुढे घेऊन जाणारे असून मुस्लिम समाजाच्या लोकांना सुद्धा अभिमान वाटावा असे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आहे. आज त्यांच्या वैद्यकीय मदत पक्षाचा फायदा समाजातील गोर गरीब रुग्णांना मोठ्या प्रमाणावर होत आहे.
करमाळा प्रतिनिधी: अमरावती येथे सुरू असलेल्या ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये…
करमाळा प्रतिनिधी: गेल्या दोन-तीन वर्षांपासून शेतकरी वर्ग सातत्याने अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करत आहे.…
करमाळा प्रतिनिधी बैलपोळा हा केवळ बैलांच्या पूजनाचा सण नसून, कृषीसंस्कृती, पशुप्रेम, कृतज्ञता आणि भारतीय परंपरेतील…
* करमाळा प्रतिनिधी : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त करमाळा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या…
करमाळा प्रतिनिधी गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा, सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक परंपरेचा उत्सव म्हणून साजरा होत…
करमाळा प्रतिनिधी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माचे ७५० वे वर्ष राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरे…