मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा -2 सन 2022 – 23 जिल्हा नियोजन लेखाशीर्ष अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील फिसरे ते हिसरे हिवरे गौंडरे या इतर जिल्हा मार्गाची सुधारणा करण्यासाठी 8 कोटी 86 लाख रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, 10.77 किमी लांब असलेल्या सदर रस्त्यासाठी प्रति किमी 82 लक्ष 29 हजार रुपये मंजूर असून सदर काम कामासाठी एकूण 8 कोटी 86 लाख 23 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. सदर रस्ता हिसरे, हिवरे, गौंडरे या गावांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण होता. या रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर झाल्यामुळे हिसरे, हिवरे, कोळगाव, निमगाव या भागातील नागरिकांचा राज्यमार्ग 68 करमाळा ते कुर्डूवाडी या रस्त्याला मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे.
करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशन एफच्या तालुकाध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती करण्यात आली…
करमाळा : प्रतिनिधी : कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक श्री. सुनील जनार्दन जाधव यांना…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा यांच्या वतीने बुधवार, दि.…
करमाळा प्रतिनिधी : - शेतकऱ्याच्या जीवनात बैलाला केवळ शेतीकामातील पशुधन म्हणून नव्हे, तर कुटुंबातील…
करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी पोथरे…