. कोर्टी प्रतिनिधी -डॉ.दुरंदे गुरुकुल ,कोर्टी. येथे दि. 8 मार्च 2023 सकाळी 9:30ते 12:30 यावेळेत जागतिक महिला दिन व बाल-विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. सौ शितलताई करे-पाटील यांच्या शुभहस्ते होईल. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ. विद्या अमोल दुरंदे या असतील.या प्रसंगी राजकीय, सामाजिक, आरोग्य, ग्रामविकास व आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या करमाळा तालुक्यातील महिलांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येईल. सत्कारमूर्ती महिला म्हणून अॕड. वर्षा नानासाहेब साखरे (श्री.रविशंकरजी आर्ट ऑफ लिव्हिंग बार्शी या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य ),
मा. नलिनी संजय जाधव (राजकीय व सामाजिक कार्य),मा. अनुसया रघुनाथ शिंदे (प्रगतशील शेतकरी),मा.ह.भ.प. सपनाताई बाळासाहेब साखरे, राजुरी (राज्यपाल पुरस्कार विजेती कीर्तनकार ),मा. पूजा मोहन मारकड (ग्रामविकास,विद्यमान लोकनियुक्त सरपंच, विहाळ),मा.ह.भ.प. गीतांजली राजेंद्र अभंग (युवा कीर्तनकार),मा. गायत्री महेश कुमार कुलकर्णी (आदर्श सरपंच, मांजरगाव),मा.मंजुषा जगन्नाथ टेकाडे ( उत्कृष्ट परिचारिका),मा. प्रमिला सोपान जाधव (बचत गटाच्या माध्यमातून सामाजिक कार्य) यांचा सन्मान होणार आहे .
तरी आमंत्रित करण्यात आलेल्या सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी ,अधिकारी ,पदाधिकारी ग्रामस्थ व पालक यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे तसेच बाल-विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी , विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी उपस्थित रहावे . असे आवाहन परिवर्तन प्रतिष्ठान सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री.डॉ.अमोल दादासाहेब दुरंदे व डॉ.दुरंदे गुरुकुल प्रशालेच्या मुख्याध्यापिका चारुशीला हरिश्चंद्र जाधव यांनी केले.
माणसाने निवृत्त झाल्यावर एकत्रित येऊन जुन्या आठवणींना उजाळा आणि मैत्रीचे नूतनिकरण करण्याची आलेली सुवर्णसंधी दवडायची…
करमाळा प्रतिनिधी जेष्ठ संसदपटू असलेले अटलबिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते.असे मत भारतीय जनता…
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…