घारगावने केला महिलादिनाचा सन्मान घारगावच्या सरपंच पदी मा. आमदार नारायण आबा पाटील गटाच्या सौ लक्ष्मी संजय सरवदे यांची बिनविरोध निवड

घारगाव प्रतिनिधी

घारगाव ग्रामपंचायतच्या नूतन सरपंचपदी माजी आमदार नारायण आबा पाटील गटाच्या सौ लक्ष्मी संजय सरवदे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
घारगाव ग्रामपंचायत सरपंच पदासाठी ८ मार्च रोजी निवडणूक झाली या निवडणुकीत सौ लक्ष्मी संजय सरवदे यांचा यांचा सरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी जगताप-शिंदे गटाचे उपसरपंच सतीश पवार तसेच मा. आ.नारायण आबा पाटील गटाचे इतर सर्व सदस्य यामध्ये माजी सरपंच लोचना पाटील, ग्रामपंचायत सदस्य कविता होगले, सदस्य आशा देशमुखे ,माजी सरपंच अनिता भोसले, सदस्य दत्तात्रय मस्तुद सर्वजण उपस्थित होते या सर्वांनी सौ लक्ष्मी संजय सरवदे यांची बिनविरोध सरपंच पदी निवड केली आहे.
निवड ८ मार्च या जागतिक महिला दिना रोजी घेण्यात यावी. अशी लेखी मागणी सर्व सदस्यांनी माननीय तहसीलदार समीर माने साहेब यांचेकडे केली त्यानंतर माननीय तहसीलदार साहेब यांनी या निवडीसाठी परवानगी दिली.
या सरपंच निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी अनिल ठाकर साहेब यांनी काम पाहिले. सोबत तलाठी मयूर क्षिरसागर साहेब तसेच सहाय्यक सोमनाथ खराडे घारगावचे कर्तव्यदक्ष ग्रामसेवक रवींद्र काळे भाऊसाहेब यांनी काम पाहिले 
तसेच यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका अध्यक्ष एडवोकेट मा. शशिकांत नरुटे तसेच मा. सरपंच किरण दादा पाटील मा. सरपंच कल्याण दादा होगले व ग्रामस्थ उपस्थित होते.
घारगाव ची सरपंच निवड ८ मार्च या जागतिक महिला दिना रोजी प्रशासनाने घेतल्याबद्दल सर्व ग्रामस्थांनी माननीय तहसीलदार समीरजी माने साहेब तसेच मंडळ अधिकारी अनिल ठाकर साहेब तलाठी भाऊसाहेब श्री मयूर क्षिरसागर व सहाय्यक सोमनाथ खराडे यांचे आभार मानले.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा इंग्लिश स्कूल संघटनेच्या नुतन तालुका अध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती

करमाळा प्रतिनिधी  महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशन एफच्या तालुकाध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती करण्यात आली…

5 mins ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांना ‘ज्ञानज्योती आदर्श पुरस्कार’ प्रदान

करमाळा : प्रतिनिधी : कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक श्री. सुनील जनार्दन जाधव यांना…

38 mins ago

गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबतर्फे गणेशोत्सवानिमित्त १६ सप्टेंबरला मोफत आरोग्य तपासणी रक्तदान शिबिराचे आयोजन – प्रशांत ढाळे

  करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा यांच्या वतीने बुधवार, दि.…

6 hours ago

२५ सप्टेंबरपासून करमाळ्यात खत विक्रीला ‘FFS’ प्रणाली गुणनियंत्रण कृषी अधिकारी देवराव चव्हाण यांचा विक्रेत्यांना इशारा लिंकिंग, काळाबाजार व चढ्या दराने विक्री केल्यास कडक कारवाई

करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…

23 hours ago

करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न; शासनस्तरावरील नियम-अटी व विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा

करमाळा  प्रतिनिधी करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी पोथरे…

1 day ago