. कोर्टी – दि. 8 मार्च 2023 रोजी परिवर्तन प्रतिष्ठान संचलित, डॉ. दुरंदे गुरुकुल, कोर्टी प्रशालेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त करमाळा तालुक्यातील कर्तुत्ववान महिलांचा सन्मान व भव्य बालविज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन उपस्थित असलेल्या सर्व महिलांच्या समवेत मा. शितलताई गणेश करे-पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. त्यानंतर सर्व महिलांनी दीपप्रज्वलन करून सावित्रीबाई फुले ,अहिल्याबाई होळकर जिजामाता यांच्या प्रतिमेचे पूजन केले. शितलताई करे पाटील यांच्या हस्ते करमाळा तालुक्यातील सर्व कर्तुत्वान महिलांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ. विद्या अमोल दुरंदे उपस्थित होत्या. या प्रसंगी सामाजिक, राजकीय, आरोग्य, ग्रामविकास व आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या करमाळा तालुक्यातील महिलांना सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रशालेच्या मुख्याध्यापिका चारुशीला हरिश्चंद्र जाधव यांनी केले.याप्रसंगी आजच्या सत्कारमूर्ती महिलांनी पुढीलप्रमाणे थोडक्यात मनोगत व्यक्त केले आहे.
•शितलताई गणेश करे पाटील. (उपाध्यक्षा, यश कल्याणी सेवाभावी सामाजिक संस्था, करमाळा). “स्त्रीभृण हत्या थांबली पाहिजेत. स्त्री- पुरुष समानता तसेच मुलींना उच्चशिक्षित करा .त्यांना स्वावलंबी बनवा.”
•अॕड. वर्षा नानासाहेब साखरे (श्री.रविशंकरजी आर्ट ऑफ लिव्हिंग बार्शी या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य ) –
“सध्याच्या युगात एकत्र कुटुंब पद्धती जतन करावे. प्रत्येक स्त्रीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणत्याच वयाची अट लागत नाही.”
•मा.नलिनी संजय जाधव (राजकीय व सामाजिक कार्य)
“आत्मसंरक्षण ,आर्थिक स्वावलंबन, मानसिक व शारीरिक मनोबल वाढले पाहिजेत .प्रत्येक महिलेने आपल्या नात्यांचा आदर करून कुटुंबाला आधार दिला पाहिजे.”
•मा.अनुसया रघुनाथ शिंदे (प्रगतशील शेतकरी),
“प्रत्येक सुनबाईला स्वतःच्या मुलीप्रमाणे वागणूक द्या. चुकेल तिथे सांगा.चांगले संस्कार द्या. सासू म्हणून कोणतेही दडपण टाकू नका.”
•मा.ह.भ.प. सपनाताई बाळासाहेब साखरे, राजुरी (राज्यपाल पुरस्कार विजेती कीर्तनकार ),
“हा दिवस म्हणजे या जगात तुम्हाला ज्या माय माऊलीने जन्म दिला. त्या प्रत्येक आईचा आहे.
•मा. प्रमिला सोपान जाधव (बचत गटाच्या माध्यमातून सामाजिक कार्य)
आत्मसंरक्षण आर्थिक स्वावलंबन तसेच मानसिक शारीरिक मनोबल वाढले पाहिजेत प्रत्येक महिलेने आपल्या नात्यांचा आदर करून कुटुंबाला आधार दिला पाहिजे
•सौ.डाॅ.विद्या अमोल दुरंदे (उपाध्यक्ष परिवर्तन संचलित)
मुलांचे संगोपन करताना होणारी कसरत खूप असते यातून आपणच आपल्या पाल्यांसमोर आदर्श निर्माण केला पाहिजे आणि स्त्रीने आपल्या आरोग्याकडे जबाबदारीने लक्ष दिले पाहिजे तिने योग्य आहार व मनःशांतता ठेऊन निरोगी राहिले पाहिजे.
•मा. पूजा मोहन मारकड (ग्रामविकास,विद्यमान लोकनियुक्त सरपंच, विहाळ),
“नानाविध भूमिकांतून आयुष्याच्या प्रत्येक क्षणी, प्रत्येक टप्प्यावर सोबत करणाऱ्या महिलांना शतशः प्रणाम…!!”
•मा.ह.भ.प. गीतांजली राजेंद्र अभंग (युवा कीर्तनकार),
“जेव्हा एक पुरुष शिकतो तेव्हा तो एकटाच सुशिक्षित होतो मात्र जेव्हा एखादी महिला शिकते तेव्हा तिची पूर्ण पिढी सुशिक्षित होऊ शकते.”
•मा. गायत्री महेशकुमार कुलकर्णी (आदर्शसरपंच,मांजरगाव),
“नेहमी करते केवळ त्याग, दुसऱ्यांसाठी घेते ती कष्ट फार, मग तिलाच का सगळा त्रास, जगू द्या तिलाही अधिकाराने करा तिचा सन्मान.”
•मा.मंजुषा जगन्नाथ टेकाडे ( उत्कृष्ट परिचारिका)
“ती आहे म्हणून हे विश्व आहे ती आहे म्हणून घराला घरपण आहे ती आहे म्हणून नात्यांत जिवंतपणा आहे तिचा सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.”
तसेच याप्रसंगी संस्थेचेअध्यक्ष सरपंच श्री. डॉ. अमोल दुरंदे, केंद्र प्रमुख आदिनाथ देवकाते सर, शिवाजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शिंदे मॅडम, पत्रकार भिसे सर,मंगेश अभंग सर, कारंडे सर, नाळे सर,कृषी सुपरवायझर नानासाहेब साखरे, राजुरी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश जाधव, ग्रामसेवक रामेश्वर गलांडे, मारुतीआबा घोगरे, विजय धुमाळ,राजेंद्र अभंग उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी कोर्टी केंद्राचे केंद्रप्रमुख मा. श्री आदिनाथ देवकते सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले ,”की प्रथम घरातील आई मुलांची शिक्षिका असते. त्यानंतर शिक्षकांना स्थान दिले जाते. त्यामुळे मुले घडवण्यात आईचा मोलाचावाटा असतो.विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव द्या. त्यातून तो पुढे सामाजिक, राजकीय शैक्षणिक क्षेत्रात नक्कीच प्रगती करेल.”
. उपस्थित असलेल्या सर्व व्यक्तींनी प्रयोग ,उपक्रम, प्रतिकृती इ. चे कौतुक केले. व पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व क्षेत्रातील अधिकारी पदाधिकारी मान्यवर ग्रामस्थ पालक इत्यादींचे आभार प्रदर्शन प्रशालेच्या सहशिक्षिका रोहिणी शिंदे मॅडम यांनी केले. आलेल्या सर्व महिलांचे , व्यक्तींचे आभार मानून तसेच उपस्थित असलेल्या महिलांनी एकमेकींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. अशा रीतीने कार्यक्रम संपन्न करण्यात आला.
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…