करमाळा प्रतिनिधी रश्मीदिदींसारखे अभ्यासू, युवा नेतृत्वास करमाळा तालुक्यातील जनतेने खऱ्या अर्थाने न्याय देवून करमाळा तालुक्याचे प्रतिनिधीत्व विधीमंडळात करण्यासाठी समर्थ साथ द्यावी असे प्रतिपादन सोलापूरचे आमदार प्रणितीताई शिंदे यांनी केले. करमाळा येथील दिगंबरराव बागल कृषी व औद्योगिक महोत्सवात महिलांसाठी आयोजित माहेर मेळावा कार्मक्रमात त्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर डॉटर्समॉम फाँडेशन सोलापूरच्या संस्थापिका, शितल देवी मोहिते – पाटील, स्वराज गृप ऑफ इंडस्ट्रिजच्या अध्यक्ष जिजामाला नाईक निंबाळकर, कृषी महोत्सवाच्या मुख्य निमंत्रक व माजी आमदार श्रीमती शामलताई बागल साखर संघाच्या संचालिका रश्मी दिदी बागल, उपस्थित होते. प्रारंभी आमदार प्रणितीताई शिंदे, शितलदेवी मोहिते पाटील,महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष सौ अरुंधती राहुल जगताप सौ जिजामाला नाईक – निंबाळकर यांनी लोकनेते स्व. दिगंबरराव बागल मामा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली. व्यासपीठावर प्रणितीताई शिंदे, शितलदेवी मोहिते पाटील, जिजामाला नाईक निंबाळकर यांचा सन्मान रश्मी दिदी बागल, मा. शामलताई बागल, प्रियांकावहिनी बागल यांनी केला. आपल्या प्रास्ताविक भाषणात साखरसंघाच्या संचालिका रश्मी बागल यांनी कृषी महोत्सवाची अभिनव कल्पना स्व. मामांच्या जयंतीनिमित्ताने राबविली असून या कृषी महोत्सवास चांगला प्रतिसाद मिळत असून या महोत्सवात महिलांसाठी माहेर मेळावा व हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करून महिलांना व्यासपीठ मिळवून दिले आहे. लोकनेते स्व. दिगंबरराव बागल मामा तसेच माजी आमदार शामलताई बागल यांनी देखील महिलांना सन्मानाची वागणूक देवून अनेक महिलांना राजकीय पदाधिकारी म्हणून संधी दिलेली आहे. या कार्यक्रमासाठी प्रणितीताई शिंदे, शितलदेवी मोहिते पाटील, जिजामाला नाईक निंबाळकर यांनी आवर्जुन उपस्थित राहिल्याबद्द्ल समाधान व्यक्त केले. मा.सुशिलकुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रीमंडळात स्व.मामा राज्यमंत्री होते. सुशिलकुमार शिंदे परीवार, मोहिते – पाटील परिवार आणि बागल परिवार यांचे जिव्हाळ्याचे नातं हते. यापुढील काळातही ते वृद्धींगत होईल असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी शितलदेवी मोहिते पाटील आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की दिगंबरराव बागल कृषी महोत्सवांतर्गत माहेर मेळाव्या साठी आम्हाला निमंत्रीत केल्याबद्दल आनंद व्यक्त करुन आभार मानले. पुढे बोलताना करमाळा तालुक्याचे नेतृत्व सक्षमपणे करण्याची क्षमता रश्मी दिदींकडेच असून करमाळा तालुक्यातील महिलांनी हे नेतृत्व जपण्याची गरज आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी स्वराज गृप ऑफ इंडस्ट्रीजच्या अध्यक्षा जिजामाला नाईक निंबाळकर यांनी मनोगत व्यक्त करताना रश्मीदिदींनी या अभिनव मेळाव्याचे आयोजन करून महिलांना व्यासपीठ दिले आहे. रश्मीदिदींना विधानसभेत पाठवण्यासाठी महिलांनी सज्ज रहावे असे आवाहन केले. प्रारंभी संदीप पाटील व प्रवीण अवचर यांनी हिंदी मराठी बहारदार गीतांचा कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर जोगळेकर यांनी केले. त्यांच्या सूत्रसंचालनाचे प्रणिती ताई यांनी कौतुक केले. या कार्यक्रमास करमाळा परिसरातील सूमारे तीन हजार महिलांची उपस्थिती होती. करमाळ्याचे आपले जुने नाते असून चिंतामणी दादा जगताप यांच्या माध्यमातून जाई जुई विचार मंचचा आमदार प्रणिती शिंदे यांनी आवर्जून उल्लेख केला.