वृद्ध आजी आजोबांची हौस केली नातवाने पुर्ण नातवाने घडवली हेलिकॉप्टर सैर

शेटफळ प्रतिनिधी

आजी- आजोबांनी आपल्यासाठी व आपल्या कुटुंबासाठी घेतलेल्या कष्टाची जाणीव ठेवून वांगी नंबर एक येथील ॠषीकेश‌ देशमुख यांनी जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या हेलिकॉप्टर राईड मध्ये आपल्या त्र्याऐंशी वर्षीय आजोबांना व पंचाहत्तर वर्षीय आजोबांना हेलिकॉप्टर सेल घडवली. हेलिकॉप्टर मधून फिरून आल्यानंतर आजी आजोबाच्या चेहऱ्यावरचा आनंद वसंत वाहत होता खाली उतरल्यानंतर आपण केलेल्या कष्टाचे चीज झाल्याची समाधान आपल्याला वाटत असल्याची प्रतिक्रिया दोघांनी यावेळी व्यक्त केली . व हा योग स्वर्गीय दिगंबरराव बागल मामा यांच्या जयंती निमित्ताने आयोजित कृषी महोत्सव मध्ये हेलिकॉप्टरमध्ये बसण्याची संधी मिळाल्याने आपल्या नातवाने घडवून आणल्याबद्दल नातवाचेही आभार व्यक्त केले. वांगी ता करमाळा येथे कृषी सेवा केंद्र व शेती साहित्य विक्रीचा ॠषीकेश देशमुख यांचा व्यावसाय आहे.आजची परिस्थिती चांगली असली तरी आजी आजोबांनी अत्यंत खडतर व संघर्षमय परिस्थितीत दिवस काढले आहेत आता चांगले दिवस आल्यानंतर त्यांच्या इच्छा नातू पुर्ण करत असतो हेलिकॉप्टरमध्ये बसण्याची त्यांना इच्छा होती या निमित्ताने नातवाने ती पुर्ण केली.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

3 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

4 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

5 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

5 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

6 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

6 days ago