करमाळा प्रतिनिधी देशासाठी आपल्या प्राणाची आहूती देणाऱ्या शहीद जवान कुटुंबाचा सन्मान करण्याचा उपक्रम त्यांच्या कार्यास खऱ्या अर्थाने आदरांजली देण्यासाठी आहे असे मत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वर्गीय दिगंबरराव बागल मामा यांच्या 68 व्या जयंतीनिमित कृषी महोत्सव कार्यक्रमात शहीद जवानाच्या वारसदार कुंटुंबाचा सत्कार प्रसंगी बोलताना व्यक्त केले.शहीद जवान मच्छिंद्र संभाजी वारे जातेगाव पत्नी विमल मच्छिंद्र वारे जय हिंद राजाराम पन्हाळकर, सालसे मुलगा प्रवीण जयंत पन्हाळकर, नवनाथ देविदास गात वरकुटे भाऊ नागनाथ देविदास गात, हंबीरराव बापूराव चौधरी साडे पत्नी राणी हंबीरराव चौधरी ,अमोल अरविंद निलंगे साडे,आई अनुजा अरविंद निलंगे वडील अरविंद रंगनाथ निलंगे आप्पासाहेब संभाजी काटे कुंभेज, पत्नी राणी आप्पासाहेब काटे ,आई सोनाबाई संभाजी काटे, भारत कोंडीबा कांबळे, पत्नी संगीता भारत कांबळे अर्जुन नामदेव कदम तडवळे माढा धनाजी रामभाऊ परबत या शहीद जवानांच्या वारसाचा सत्कार लोकनेते स्वर्गीय दिगंबररावजी बागल कृषी महोत्सवामध्ये यथोचित मानसन्मान देऊन करण्यात आला. स्वर्गीय दिगंबरराव बागल मामांच्या जयंतीनिमित्त कृषी महोत्सवाचे आयोजन हा उपक्रम स्तुत्य असुन मामांचा वारसा रश्मी दीदी बागल दिग्विजय बागल यशस्वीपणे चालवत चालवत आहे ही मुले धडपड करणारी आहेत. देशाचे संरक्षण करण्यासाठी सीमेवर सैनिक असल्यामुळे आपण सुरक्षित आहोत त्यांच्या कुटुंबाच्या त्याग समर्पण योगदान मोलाचे आहे त्याची जाण प्रत्येक भारतीयांनी ठेवून त्यांच्या वारसाचा सन्मान करावा या महोत्सवामध्ये ती जाण ठेवून शहीद जवानांच्या वारसांचा सत्कार आदर्शवत आहे. आदिनाथ मकाई जरी अडचणीत असले तरी हे दोन्ही साखर कारखाने अडचणीतून बाहेर काढण्यासाठी शासनामार्फत आपण सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन राज्यमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले .लोकनेते स्व. दिगंबरराव बागल मामा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कृषी महोत्सवाच्या चौथ्या दिवशी पालकमंत्री राधाकूष्ण विखे पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, प्रांत अधिकारी ज्योती कदम भाजपचे विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे सर, राज्य साखर संघाच्या संचालिका रश्मी बागल, करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रा. शिवाजी बंडगर, उपसभापती चिंतामणी जगताप, आदिनाथचे अध्यक्ष धनंजय डोंगरे, भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात मकाईचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी सुरुवातीला तालुक्यातील आदिनाथ आणि मकाई या सहकारी साखर कारखान्याला सरकारने मदत करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने आदिनाथ कारखाना यावर्षी सुरु झाला. मात्र आता हे कारखाने व्यवस्थित सुरु रहावेत म्ह्णून सरकारकडून आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी केली. त्यानंतर विखे पाटील यांनी कारखान्याला मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असे आश्वासन दिले. सहकारी साखर कारखानै टिकले पाहिजे यासाठी सहकार्य करणार असल्याचे सांगितले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदिनाथ कारखान्याचे चेअरमन धनंजय डोंगरे यांनी केले स्वागत मकाईचे संचालक संतोष देशमुख सूत्रसंचालन शेखर जोगळेकर तर आभार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्राध्यापक शिवाजीराव बंडगर सर यांनी मानले .