Categories: करमाळा

स्त्री ही जगाची जननी असून स्त्रियांनी चूल आणि मूल या संकल्पनेतून बाहेर पडून पुरुषाच्या बरोबरीने आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये भरारी घ्यावी- नगरसेविका सौ स्वातीताई फंड

करमाळा प्रतिनिधी स्त्री ही जगाची जननी असून स्त्रियांनी चूल आणि मूल या संकल्पनेतून बाहेर पडून पुरुषाच्या बरोबरीने आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये भरारी घ्यावी असे मत जिजाऊ महिला ग्रुपच्या अध्यक्षा नगरसेविका सौ स्वाती महादेव फंड यांनी व्यक्त केले. 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित महिला मेळाव्याप्रंसगी बोलत होत्या.जिजाऊ महिला ग्रुपच्या वतीने महिला दिन मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करण्यात आला.सामाजिक उपक्रमास मदत देऊन महिला दिन साजरा करण्यात आला असून सामाजिक बांधिलकीची भावनेतून निराधार वृद्ध अपंगांना मोफत अन्नदान करून अन्नपूर्णा योजना चालवणाऱ्या श्रीराम प्रतिष्ठानला मदतीचा एक हात म्हणुन शंभर किलो गहू,साठ किलो तांदूळ एक तेलाचा डबा असे दहा हजार रुपयांचे किराणा मालाचे दान करण्यात आले.या कार्यक्रमात वृध्द निराधार विधवा महिलांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. जिजाऊ ग्रुपने दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक उपक्रमाद्वारे अन्नदान करून महिला दिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला याबद्दल श्रीराम प्रतिष्ठाचे अध्यक्ष गणेश भाऊ चिवटे यांनी जिजाऊ महिला ग्रुपचे आभार मानुन कौतुक केले. यावेळी निराधार जेष्ठ महिला व जेष्ठ नागरिकांचा जिजाऊ ग्रुपच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. राष्ट्रमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले व स्वतंत्र स्वराज्य निर्मिती करण्याचा संकल्प पुर्ण केला.महाराष्ट्राच्या भुमिमध्ये राणी ताराबाईने औरंगजेब रडवला,मैं झाशी नहीं दुंगी असे इंग्रजांना ठणकावून सांगत इंग्रजाबरोबर संघर्ष करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई स्त्री शिक्षणाची महती ओळखुन स्त्रियांना शिक्षणाचे दारे खुली करून देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळे स्त्रियांचे सबलीकरण झाले आहे आजच्या काळामध्ये नारीशक्ती हिच खरी शक्ती आहे. घरात तिला आदर द्या प्रेम जिव्हाळा जिणे शिल्पकार होऊन तुमच्या जीवनाला आकार दिला आहे अशा महिलांचा सन्मान करण्याचे आवाहन त्यांनी केले. स्वाती फंडअर्चना फंडकविता नीळ
रुपाली राजेभोसलेरत्नमाला मुथासोनिया राठोड
किरण मुथा माया भागवत सविता चिवटे वंदना पाटील पुष्पा गोसावी भारती वडणे जयश्री देवकर चंदा सरकुंडे विजयमाला चवरे सिंधु पवारकल्याणी काळे मंगल ससाणे राणी साळुंखे जोसना बनकर
प्रतिभा घाडगे साधना जाधव शेंडे मॅडम कटीमणी मॅडम बोधे मॅडम प्रसन्ना मॅडम मनिषा मोरे संध्या शिंदे योगिता चवरे शितल करे यांच्यासह जिजाऊ ग्रुपच्या सर्व महिला श्रीराम प्रतिष्ठानचे कार्यकर्ते पदाधिकारी सर्व निराधार अपंग वृद्ध जेष्ठ नागरिक महिला लाभार्थी उपस्थित होते. यावेळी कविता निळ,भारती शेंडे, सुनीता भोसेकर,संध्या कट्टमनी,माया भागवत,पुष्पा गोसावी,राणी नाईकवाडी, वैशाली देवकर,भारती ओढणे,पल्लवी साडेकर, साधना जाधव,शुभदा घोलप, नंदा बोराटे,वंदना पाटील, विजयमाला चवरे, सोनिया राठोड,रेश्मा सूरवसे, वैशाली कोळी, सुनीता सातव , सुनीता शिंगाडे,शमा बोधे, शितल फंड,अर्चना फंड,कल्याणी काळे,राणी राऊत, मंगल ससाणे,ज्योत्सना बनकर, अनुश्री कुलकर्णी,अलका बरुटे, रूपाली राजेभोसले, कविता नीळ,सविता चिवटे,प्रतिभा घाडगे, शितल करे पाटील,स्वातीताई फंड,प्रणिता जव्हेरी , मनिषा मोरे , कविता मोरे,अनिता राऊत,प्रमिला शिंदे,सुवर्णा पोतदार,रोहिणी फंड,निरा फंड, संध्या शिंदे रेखा इंगोले, सुरेखा खरात यांच्यासह जिजाऊ ग्रुपच्या सर्व महिला श्रीराम प्रतिष्ठानचे कार्यकर्ते पदाधिकारी सर्व निराधार अपंग वृद्ध जेष्ठ नागरिक महिला लाभार्थी उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

भारतरत्न माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देवळाली येथे नेत्ररोग तपासणी संपन्न

करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…

10 hours ago

अवैध वाळु उपसा बंद करा आमदार नारायण पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पञ

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…

11 hours ago

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

2 days ago

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

3 days ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

4 days ago

पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांचा सहकुटुंब सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील‌ उद्योजक क्लासिक कंपनीचे ‌ मालक ‌ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…

4 days ago