Categories: करमाळा

एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या रिक्त जागांची भरती सुरू… उमेदवारांनी अर्ज करण्याचे आ.संजयमामा शिंदे यांचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प करमाळा या कार्यालयाच्या वतीने अंगणवाडी सेविका, मिनी सेविका व मदतनीस पदाकरिता 2023 मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून त्याचे उमेदवारी अर्ज दिनांक 10 मार्च 2023 पासून भरण्यास प्रारंभ झालेला असून उमेदवारांची अंतिम निवड यादी दिनांक 27 एप्रिल 2023 रोजी प्रकाशित होणार आहे तरी तालुक्यातील रिक्त असलेल्या ग्रामपंचायतीमधील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदांसाठी उमेदवारांनी अर्ज करावेत असे आवाहन आ. संजयमामा शिंदे यांनी केले आहे.
तालुक्यातील टाकळी, देवळाली, आळसुंदे ,वरकुटे, अर्जुननगर ,तरडगाव या गावांमध्ये सेविका पद रिक्त असून पारेवाडी, रामवाडी, साडे या गावांमध्ये मिनी अंगणवाडी सेविका पद रिक्त आहे. त्याचप्रमाणे झरे, कुंभेज ,वांगी ,केडगाव ,केम, शेलगाव वांगी, कंदर, वडशिवणे, वाशिंबे ,उंदरगाव ,वीट,कोर्टी,विहाळ,पारेवाडी, केतुर ,सावडी, कुंभारगाव, कोंढार चिंचोली, खातगाव ,शेलगाव क,पोथरे, देवीचा माळ, वंजारवाडी, देवळाली ,पाथुर्डी ,आवाटी ,हिसरे, निमगाव ह,मिरगव्हाण, पांडे, बिटरगाव श्री , तरडगाव मलवडी या गावांमध्ये मदतनीस हे पद रिक्त आहे .
भरती प्रक्रियेचे वेळापत्रक प्रत्येक ग्रामपंचायतीला पाठवलेले असून सदर पदांकरिता अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 मार्च 2023 आहे. उमेदवारांची प्राथमिक गुणवत्ता यादी प्रकाशित करण्याची तारीख 10 एप्रिल आहे, प्रकाशित झालेल्या यादीवर आक्षेप नोंदविण्याची तारीख 21 एप्रिल आहे व अंतिम यादी दिनांक 25 एप्रिल रोजी प्रकाशित होणार असून निवड यादी दिनांक 27 एप्रिल रोजी प्रकाशित होणार आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

4 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago