सोलापूर जिल्हा गटसचिवांची सह पतसंस्थेच्या चेअरमन पदी बबनराव मेहेर, व्हा .चेअरमन पदी विश्वनाथ भोसले यांची निवड

करमाळा प्रतिनिधी सोलापूर जिल्हा गटसचिवांची सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी करमाळ्याचे बबनराव मेहेर, व्हा .चेअरमन पदी अक्कलकोटचे विश्वनाथ भोसले यांची बिनविरोध निवड पार पडली . सोलापूर जिल्हा गटसचिवांच्या पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणुक नुकतीच बिनविरोध पार पडली होती . निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री ढोणे यांनी काम पाहीले . श्री ढोणे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापुर येथील पतसंस्थेच्या मुख्यालयात अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची बैठक पार पडली . यावेळी मेहेर व भोसले यांचे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी एकेकच अर्ज आल्याने त्यांची अविरोध निवड जाहीर करण्यात आली . यावेळी पतसंस्थेचे नूतन संचालक विजयकुमार भांड, दिलीप सावंत, विठ्ठल एकतपूरे, युवराज मुंडे, अण्णासाहेब शिंदे, विलास झांबरे, दिलीप नलवडे, तानाजी वाघमोडे, नागनाथ नागेशी, नवनाथ पाटोळे, आण्णा बाबर, रघुनाथ शिंदे, मीना पवार, सुरेखा थिटे आदी उपस्थित होते . निवडीनंतर मेहेर व भोसले यांचे आमदार राजेंद्र राऊत, माजी आमदार जयवंतराव जगताप, आमदार संजयमामा शिंदे,जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड , डीसीसी बॅकेचे प्रशासक कुंदन भोळे यांनी अभिनंदन केले . यावेळी गटसचिव संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग व्यवहारे, उपाध्यक्ष दिवसे भाऊसाहेब, पतसंस्थेचे माजी अध्यक्ष दत्तप्रसाद पाटील, मोहनराव देशमुख, नारायण गुंड, महादेव घाडगे, कदम भाऊसाहेब आदी उपस्थित होते .

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

  करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…

2 days ago

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

3 days ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

4 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

4 days ago