ऊस व केळी पीक जोमात,मात्र कोरोनामुळे करमाळा तालुक्यातील शेतकरी वर्ग चिंतेत


वाशिंबे प्रतिनिधी. करमाळा तालुक्यातील वाशींबेसह उजनी धरणाच्या बॅक वॉटर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात लागवड झालेल्या ऊसाचे व केळीचे पीक जोमात आले आहे.केळीचे पीक दोनच महिन्यात काढण्यात येणार आहे, या दोन्ही पिकाच्या काढण्याच्या कामासाठी कोरोना संसर्गाने मजूंर मिळण्याच्या संकट उभे ठाकले आहे.व एकीकडे बाजारभावाची चिंता व मजूर कंत्राटदार व वाहतूकदार देखील चिंतेत सापडलेले आहेत.करमाळा तालुक्यातील उजनी बॅकवॉटर च्या क्षेत्रात वाशिंबे केतुर ,उमरड, सोगाव,कंदर, वांगी, हा भाग ऊस व केळी पिकाची आगार म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. परंतु कोरोना रोगाच्या वाढत्या संसर्गामुळे व लॉकडाऊन मुळे मुळे या भागातील शेतकरी पूर्ण हवालदिल झाला आहे. एकीकडे ऊस पिकाला बगल म्हणून केळी सारख्या पिकाकडे शेतकरी वळला होता, सध्या केळीचे पिक हे दोन महिन्यात परिपक्वतेला येत आहे. परंतु पुढील होणाऱ्या या रोगाच्या परिणामामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रकारची अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झालेले आहे.तसेच या भागात ऊस पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मागील वर्षी उजनी धरणातील पाणीसाठा आणि यावर्षी आलेला पाऊस यामुळे ऊस पिके जोमात आहे. चांगल्या प्रकारचे उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा ऊस उत्पादकांना आहे, परंतु कोरोना या महामारीमुळे ऊस तोडणी कामगारांची अडचण असल्याने एक प्रकारची चिंता या भागातील शेतकऱ्यांच्या व ऊस वाहतूकदारांच्या मनामध्ये सतावत आहे.

ऊस तोडणी कामगारांना आम्ही पैसे दिले आहेत,परंतु ज्या भागातील मजूर या कामासाठी येतात त्याच भागात कोरोना रोगाचा संसर्ग वाढत आहे, त्यामुळे मनात एक प्रकारचे चिंतेचे वातावरण आहे.      –सुभाष मोहन झोळ वाशिंबे ऊस वाहतूकदार

केळी हे पीक पुढील दोन महिन्यात काढण्यात येत आहे परंतु कोरोना लॉकडाऊन मुळे योग्य बाजारभाव व व्यापाऱ्यांकडून माल एक्सपोर्ट होतो की नाही याची शंका शेतकरी वर्गात आहे.
रणजित शिंदे वाशिंबे केळी उत्पादक

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

19 hours ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

2 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

2 days ago