वाशिंबे रेल्वे स्थानकावर नव्याने सुरू झालेल्या दौंड – सोलापूर,सोलापूर दौंड डेमू गाडीला थांबा देण्याची मागणी वाशिंबे येथील गणेश झोळ यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी झोळ यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की वाशिंबे रेल्वे स्थानकावरून सकाळी दौंड, पुणे येथे व संध्याकाळी जेऊर, कुर्डुवाडी,सोलापूर येथे वाशिंबे परिसरातील सोगाव,ऊंदरगाव,गोयेगाव,
मांजरगाव,राजूरी, रीटेवाडी येथील नागरीकांना
दवाखाना,कोर्ट कचेरीची, शाळा, कॉलेज,खरेदी, चाकरमानी यांना जावे लागते.परंतू सध्या या वेळेत स्टेशन वर कुठल्याही गाडीला थांबा नाही.त्यामुळे या परिसरातील नागरीकांना गैरसोईला सामोरे जावे लागते.त्यामध्ये रेल्वे प्रशासनाने नव्याने सुरू केलेली सोलापूर दौंड व दौंड सोलापूर डेमू गाडीला वाशिंबे स्थानकावर थांबा देण्यात आला तर नागरीकांना सोईस्कर होणार आहे.या निवेदनाच्या प्रती जनरल मॅनेजर मध्य रेल्वे मुंबई, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोलापूर, यांना देण्यात आल्या आहेत.
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…