Categories: Uncategorized

आमदार संजय शिंदे ज्या रस्त्याने करमाळयाला जातात त्या रस्त्याला निधी उपलब्ध होऊ शकत नाही जनशक्ती संघटना ‘श्रमदान’ करून करणार ‘आंदोलन’

माढा प्रतिनिधी माढा तालुक्यातील निमगाव टें ते उपळवाटे – केम रस्ता अत्यंत खराब झाला असून या रस्त्याची अत्यंत दयनीय परिस्थिती झाली आहे. हा रस्ता माढा तालुक्यातील ३६ गावे व करमाळा तालुक्याला जोडणारा प्रमुख मार्ग असून या रस्त्यासाठी लोकप्रतिनिधी असणारे संजय शिंदे निधी उपलब्ध करू शकत नाहीत म्हणून जनशक्ती संघटनेच्या वतीने श्रमदान करून या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन संस्थापक अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी दिले आहे.

माढा तालुक्यातील निमगाव टें ते उपळवाटे – केम रस्तावर भले मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावर मोठ मोठे दगड गोटे आले आहेत. यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना तारेवरची कसरत करत रस्त्याने प्रवास करावा लागतो. खराब रस्त्यामुळे या ठिकाणी अनेक छोटे-मोठे अपघात झाले आहेत. शेतकरी, दूधवाले, विद्यार्थी यांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे. इतकी दयनीय परिस्थिती असताना देखील मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आमदार संजय शिंदे रस्त्यासाठी निधी उपलब्ध करू शकत नाहीत. त्यांना देखील या रस्त्याने येताना जाताना मोठी तारांबळ उडते.

यासाठी जनशक्ती संघटनेच्या वतीने शुक्रवार दि.२४ मार्च रोजी श्रमदान करून या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी, तहसीलदार, बांधकाम विभाग यांना देण्यात आले आहे

चौकट

आमदार संजय शिंदे हे करमाळा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी आहेत. याच रस्त्यावरून आठवड्यातून एकदा किंवा दोनदा त्यांचा प्रवास होतो. जो आमदार स्वतःच्या राहत्या गावापासून मतदार संघात जायला रस्ता करू शकत नाही तो आमदार विधानसभा मतदारसंघाचा काय विकास करणार..?

अतुल खूपसे पाटील
संस्थापक, जनशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा इंग्लिश स्कूल संघटनेच्या नुतन तालुका अध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती

करमाळा प्रतिनिधी  महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशन एफच्या तालुकाध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती करण्यात आली…

45 mins ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांना ‘ज्ञानज्योती आदर्श पुरस्कार’ प्रदान

करमाळा : प्रतिनिधी : कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक श्री. सुनील जनार्दन जाधव यांना…

1 hour ago

गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबतर्फे गणेशोत्सवानिमित्त १६ सप्टेंबरला मोफत आरोग्य तपासणी रक्तदान शिबिराचे आयोजन – प्रशांत ढाळे

  करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा यांच्या वतीने बुधवार, दि.…

7 hours ago

२५ सप्टेंबरपासून करमाळ्यात खत विक्रीला ‘FFS’ प्रणाली गुणनियंत्रण कृषी अधिकारी देवराव चव्हाण यांचा विक्रेत्यांना इशारा लिंकिंग, काळाबाजार व चढ्या दराने विक्री केल्यास कडक कारवाई

करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…

23 hours ago

करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न; शासनस्तरावरील नियम-अटी व विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा

करमाळा  प्रतिनिधी करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी पोथरे…

1 day ago