करमाळा प्रतिनिधी आदिनाथ कारखाना चालवण्यासाठी सकारात्मक विचार असणाऱ्या स़ंचालक मंडळाची गरज असून पैसे मिळवण्यापेक्षा पैसे देणाऱ्यांची आदिनाथला गरज आहे आदिनाथ कारखान्याची गाळप क्षमता वाढून कारखान्यात विकासाचे धोरण राबविल्यास आदिनाथला पुन्हा गत वैभव प्राप्त होऊ शकते असे मत दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बचाव समितीचे नेते प्राध्यापक रामदास झोळ सर यांनी व्यक्त केले. पुढे बोलताना ते म्हणाले की आदिनाथ कारखाना चालू होईल का नाही अशा परिस्थितीमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे बचाव समितीचे अध्यक्ष हरिदास डांगे डॉक्टर वसंतराव पुंडे आम्ही तिघे सुरुवातीला आदिनाथ कारखाना सहकारी राहून कसल्याही परिस्थितीत चालू करण्याविषयी चर्चा केली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस पालकमंत्री राधाकृष्ण पाटील आरोग्य मंत्री तानाजी सावंत प्राध्यापक शिवाजी सावंत त्यांच्या सहकाऱ्यांने त्यानंतर न्यायालयीन लढा जिंकल्यानंतर भांडवलारुपी सहकार्य घेऊन पाटील बागल यांच्या संचालक मंडळाच्यावतीने आदिनाथ कारखाना चालू झाला या कारखान्याने 78 हजार मॅट्रिक टनाचे गाळपही केली कुठलीही यंत्रणा नसताना केवळ लोकांच्या श्रद्धेपोटी हा कारखाना चालू झाला हे मोठे यश असून आता मात्र आदिनाथ कारखाना चालू करण्यासाठी अतिरिक्त उसाचा प्रश्न सोडवण्यासाठी आदिनाथ कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन दहा हजार टन करणे गरजेचे असून याचबरोबर आदिनाथ कारखान्याला अडीचशे एकर जमीन असल्याने या जमिनीचाही योग्य वापर करून या परिसरामध्ये एमआयडीसीची उभारणी करणे गरजेचे असून या माध्यमातूनही कारखान्याला मोठे उत्पन्न मिळणार आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्गामध्ये आदिनाथ कारखान्याची ही जमीन गेली असल्याने त्याचीही मोठी भरपाई मिळून कारखान्याला भाग भांडवल उभारण्यासाठी त्याचीही मोलाचे सहकार्य होऊ शकते. याचबरोबर आजिनाथ कारखान्याची नोंदणी मायक्रो मेडीयम उद्योग व्यवसायामध्ये करून व्यवसाय वाढीच्या दृष्टिकोनातून या केंद्रीय संस्थेमार्फत नामदार नारायण राणे यांच्या सहकार्यीने साडेसात टक्के व्याज दराने कर्ज मिळून कारखान्याचे विकासाच्या दृष्टिकोनातून त्याचा चांगला फायदा होऊ शकतो सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक कारखाने अडचणीत आहे दोनशे तीनशे कोटी कर्ज आहे .या कारखान्यांनी दहा लाख त्यांना पर्यंत यशस्वी गाळप केले आहे त्यामानाने आदिनाथ कारखान्यावर असणारे कर्ज हे सर्वसाधारण सस्वरुपाचे असून योग्य नियोजन व त्याप्रमाणे अंमलबजावणी केल्यानंतर आदिनाथ कारखान्याला नक्कीच गतवैभव मिळणार आहे आदिनाथ कारखान्याची निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असणाऱ्यांनी राजकारणणापेक्षा कारखाना कसा चालेल त्यामुळे शेतकरी सभासद याच्या उसाला योग्य भाव कामगाराची जीवनमान कसे उंचावेल ही भावना ठेवून वाटचाल केल्यास चांगले विचार असलेली माणसे संचालक मंडळात घेऊन निवडणूक बिनविरोध करावी हेच कारखान्याच्या हिताचे असल्याचे प्राध्यापक रामदास झोळ सर सांगितले आहे.