करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील ग्रामस्थ व रेल्वे प्रवासी संघटना यांनी शनिवार दिनांक १८ मार्च२०२३ रोजी पारेवाडी रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाड्यांचे थांब्याचे मागणी बाबत एल्गार- मोर्चाचे आयोजन केलेले होते. ग्रामस्थ,व्यापारी, महिला यांचेसह वारकरी आणि शाळकरी मुलेही यात सहभागी होती. प्रचंड मोठ्या गर्दीत मोर्चाने रेल्वे विभागाला एक्सप्रेस गाड्या थांबवण्याची मागणी केली.१९९७ पासुन याचा पाठपुरावा चालु असुन, पारेवाडी रेल्वे स्थानक आणि आसपासच्या परिसरातुन हजारो प्रवाशांची मागणी विचारांती घेऊन विद्यमान खासदार. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सकारात्मक पाऊले उचलली यासाठी करमाळा तालुका भाजपा अध्यक्ष गणेश चिवटे यांनी प्रयत्न केले आहे , दोन ते तीन महिन्यात पारेवाडी रेल्वे स्टेशनला एक्सप्रेस थांबविण्या बाबत आश्वासित केलेले आहे. याबाबत रेल्वे विभागाचे अधिकारी यांनीही रेल्वे प्रवासी संघटनेशी चर्चा केली असुन, याबाबतचा प्रस्ताव तातडीने देण्याच्या हालचाली चालु झालेल्या आहेत.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…