सहकार क्षेत्रात माजी आमदार जयवंतराव जगताप गटाचेच वर्चस्व कायम

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणूका नुकत्याच पार पडल्या आहेत . यामधे बहुतांश गावच्या सोसायट्यांमधे जगताप गटाचा दबदबा कायम राहीला आहे . गतवर्षी झालेल्या वि .का . संस्थांच्या निवडणुकीत देखील जवळपास ७० टक्के गावच्या सोसायट्या जगताप गटाच्या ताब्यात आल्या आहेत . नुकत्याच झालेल्या करंजे, शेलगाव (क ), कोळगाव, बाळेवाडी, सौंदे, दिवेगव्हाण, पांगरे, राजुरी, सांगवी, शेलगाव (वां ), वीट, कामोणे, पुनवर, वरकुटे, अर्जुननगर, जातेगाव या संस्था माजी आमदार जयवंतराव जगताप गटाकडे तर टाकळी, पोमलवाडी, बोरगाव, चिखलठाण, करमाळा , या संस्था आ . संजयमामा शिंदे समर्थकांकडे बिनविरोध आलेल्या आहेत . या बिनविरोध पार पडलेल्या निवडणुका स्थानिक पातळीवर माजी आ .जगताप, माजी आ. नारायण पाटील, आ. शिंदे व बागल गटाच्या कार्यकर्त्यांनी सामंजस्याने पार पाडल्या आहेत . जिंती सोसायटीच्या झालेल्या निवडणुकीत माजी आ पाटील समर्थक राजेभोसले गटाने विजय मिळविला आहे . पोफळज सोसायटी माजी आ. पाटील समर्थक व कल्याण पवार यांचेकडे आहे . तर सध्या निंभोरे, नेर्ले, हिंगणी, झरे व कंदर सोसायटीची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे . सावडी संस्थेची प्रारूप यादी प्रसिद्ध झाली आहे .या सोसायटीच्या माध्यमातूनच सोलापूर जिल्हा मध्य .सह . बँक,कृषी उत्पन्न बाजार समिती, तालुका खरेदी – विक्री संघ या संस्था वरील सत्ता जगताप गटाने अबाधित ठेवल्या आहेत . जगताप गटाने गेल्या ६० वर्षापासून सहकार क्षेत्रावर वर्चस्व ठेवले आहे . माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप हे तब्बल ३५ वर्षे डिसीसी बँकेचे संचालक, काही काळ चेअरमन तर मार्केट कमिटीचे २५ वर्षे सभापती होते . त्यांचेनंतर १९९० सालापासून माजी आमदार जयवंतराव जगताप बँकेचे संचालक व काही काळ व्हा .चेअरमन राहिले आहेत तर मार्केट कमिटीच्या इतिहासात सर्वाधिक काळ तब्बल २९ वर्षे सभापती पदी कामकाज पाहीले आहे . बाजार समिती क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवामुळे माजी आ. जगताप यांची महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघावर बिनविरोध संचालक पदी निवड झाली आहे .डीसीसी बॅक, बाजार समितीचे अधिकारी, कर्मचारी, सोसायट्यांचे गटसचिव, शेतकरी, व्यापारी यांचे जगताप गटाशी या माध्यमातूनअतूट असे नाते आहे . गत बाजार समितीच्या निवडणुकीत बदललेल्या निवडणूक नियमांचा जगताप गटाला फटका बसला होता . परंतु पुनश्च निवडणूक प्रक्रियेत दुरुस्ती होवून सोसायटी व ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळाल्यामुळे जगताप गट मजबूत स्थितीत आहे . सहकार क्षेत्रातील या वर्चस्वामुळे माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा सहकार क्षेत्राात आपले वर्चस्व सिद्ध केले .

saptahikpawanputra

Recent Posts

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

1 day ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

1 day ago

पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांचा सहकुटुंब सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील‌ उद्योजक क्लासिक कंपनीचे ‌ मालक ‌ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…

2 days ago

निमगाव (ह )येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर अल्पदरात चष्म्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…

2 days ago

करमाळा एमआयडीसी मधील भूखंड वाटपास सुरुवात उद्योजकांनी लाभ घ्यावा जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी छोटे छोटे भूखंड उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आपण विशेष प्रयत्न केले असून उद्योग…

5 days ago