आमदार संजयमामा शिंदे यांनी कुकडी प्रकल्प अंतर्गत येणारी पोंधवडी या चारीचे काम पूर्ण करून पाणी देण्याचे वचन पुर्ण विहाळ तलावातील कुकडीच्या पाण्याचे ग्रामस्थांकडून पूजन

विहाळ प्रतिनिधी
कुकडी प्रकल्प डावा कालवा अंतर्गत पोंधवडी चारीचे काम निधीअभावी 2009 पासून रखडलेले होते. सदर चारीच्या कामासाठी निधी मिळावा म्हणून विहाळ, कोर्टी ,गोरेवाडी ,हुलगेवाडी ,कुस्करवाडी राजुरी, वीट, अंजनडोह या गावातील नागरिक सातत्याने लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करत होते.कॅनॉलचे कामे रखडल्यामुळे कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावांमध्ये कुकडीचे पाणी दाखल झालेले नव्हते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार संजयमामा शिंदे यांनी कुकडी प्रकल्प अंतर्गत येणारी पोंधवडी या चारीचे काम पूर्ण करून या चारीवरील गावांना आपण पाणी देऊ असे वचन दिले होते. त्या वचनाची पूर्ती आ. संजयमामा शिंदे यांच्याकडून झाल्यामुळे विहाळ तलावात प्रथमच कुकडीचे पाणी दाखल झाले.
विहाळ तलावातील या पाण्याचे पूजन सौ.लोचना कारभारी येळे ग्रा प सदस्य,सौ.उषा बाळू येळे,सौ. नंदाबाई बबन येळे,सौ.सारीका रामदास येळे,सौ. सुशीला बाई नवनाथ येळे या महिलांच्या हस्ते करण्यात आले .याप्रसंगी सुभाष अभंग, मोहन तात्या मारकड सरपंच ,प्रदीप भाऊ हाके ग्रा प सदस्य, शिवाजी नाळे ग्रा प सदस्य, बबन येळे ग्रा प सदस्य, कारभारी येळे मा ग्रा प सदस्य बिन्टू येळे, धनंजय नाळे सर,सोमा नाळे, मंगेश येळे, बाळू येळे, राजेश येळे जालीधंर नाळे, अनिल नाळे, अजित येळे,सुजीत येळे, प्रदीप येळे,हानूमंत येळे,सुरज ढेरे आदी उपस्थित होते.

चौकट –
कुकडी डावा कालवा अंतर्गत पोंधवडी शाखा कालवा- हुलगेवाडी चारीचा शुभारंभ गतवर्षी आ. संजयमामा शिंदे यांच्या शुभ हस्ते व मा.आ.जयवंतराव जगताप यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला होता. मागील 3 पंचवार्षिक योजनेत या कामासाठी पुरेसा निधी मिळत नव्हता त्यामुळे हे काम रखडले होते. संजयमामा शिंदे आमदार झाल्यानंतर शासन दरबारी सतत पाठपुरावा करून 9 कोटी 23 लाखांचा निधी मंजूर करून काम सुरू केले होते

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

6 hours ago

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

2 days ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

2 days ago

पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांचा सहकुटुंब सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील‌ उद्योजक क्लासिक कंपनीचे ‌ मालक ‌ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…

2 days ago

निमगाव (ह )येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर अल्पदरात चष्म्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…

3 days ago