करमाळा प्रतिनिधी आमदार.संजयमामा शिंदे करमाळा मतदारसंघातील वीज, पाणी, रस्ते , आरोग्य आदी विकासकामे अतिशय निष्ठेने व कर्तव्य भावनेने पार पडत असून जनतेही ही कामे स्मरणात ठेवावीत असे मत माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी व्यक्त केले .आवाटी येथील ३३ केव्ही सबस्टेशनचे भुमीपूजन उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आदिनाथचे माजी संचालक तानाजी झोळ, आवाटीचे सरपंच शाबीर खान , बाजार समितीचे माजी संचालक महादेव धोंडे, नसरूल्ला खान, माजी जि . प सदस्य नानासाहेब नीळ , मांगी सोसायटीचे चेअरमन सुजीत बागल , दादासाहेब सांगडे, समाधान दोंड, तानाजी जगताप , महावीर साळुंके , उद्योजक भरत आवताडे , सुभाष बेडकुते,वीज कंपनीचे इंजी. श्री गलांडे उपस्थित होते .
याविषयी अधिक बोलताना माजी आमदार जगताप महादेव की, आ .शिंदे यांनी आवाटी येथील सबस्टेशनचे काम केल्यामुळे या भागातील जनतेचा वीजेचा फार महत्वाचा प्रश्न मार्गी लागला आहे. आ . शिंदे मतदारसंघातील सर्वच कामांचा पाठपुरावा योग्य रितीने करीत असून कोणतेही काम अपूर्ण राहणार नाही याची ग्वाही आ .शिंदे यांचेवतीने मी देतो आमदार संजयमामा शिंदे यांनी केलेली विकास कामे लक्षात ठेवा आणि 2024 साली आमदार शिंदे यांना पुन्हा एकदा आमदार करण्याची आपली जबाबदारी आहे याचेही भान असू द्या असे आवाहन त्यांनी केले .
या प्रसंगी आ. संजय मामा शिंदे यांनी 2020 ते 23 या कार्यकाळातील विकास कामांचा आढावा मांडला. डिकसळ पुल , जातेगाव टेंभुर्णी रस्ता , कुटीर रुग्णालयातील मंजुर सुविधा , रस्ते उभारणीसाठी चा मंजूर निधी , स्थगीती उठविलेला विकास नीधी आदी बाबींचा आढावा देत आणखी काही मंजूर कामाच्या निधीला दिलेली स्थगिती उठवणेसाठी न्यायालयात जाणार असल्याचे देखील सांगीतले .
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…