जेऊर येथे जिजाऊ ब्रिगेड व लोकस्वराज प्रतिष्ठान यांच्यावतीने महिला दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा

जेऊर प्रतिनिधी जेऊर येथे जिजाऊ ब्रिगेड व लोकस्वराज प्रतिष्ठान यांच्यावतीने महिला दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. महिलांच्या कला गुणांना व बौद्धिक क्षमतेला वाव देण्यासाठी जिजाऊ ब्रिगेड व लोकस्वराज प्रतिष्ठान ने आयोजित केलेला उपक्रम अतिषय स्तुत्य व अनुकरणीय असल्याचे यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील यांनी सांगितले. करे-पाटील जिजाऊ ब्रिगेड व लोकस्वराज प्रतिष्ठान जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात बोलत होते. ते पुढे म्हणाले की, या कार्यक्रमाच्या निमित्ताने घेतलेल्या वक्तृत्व, वेशभूषा व होममीनिस्टर स्पर्धामध्ये सामान्य महिलांना त्यामध्ये सहभागी होण्याची संधी देणाऱ्या आहेत.
यावेळी स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या महिलांना विविध बक्षिसांचे वितरण गणेश करे पाटील जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्षा सोलापुर सुरजा बोबडे जलसंपदा विभागाच्या अधिकारी माधुरी पवार या मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले
होमिनिस्टर स्पर्धेत पहिले बक्षीस सुवर्णा मोहिते, दुसरे बक्षीस आरती घाडगे, तिसरे बक्षीस प्रियंका देवकते, उत्तेजनार्थ स्वाती सुरवसे यांना मिळाले.
वक्तृत्व स्पर्धा पहिले बक्षीस अपर्णा पाथरूडकर, दुसरे बक्षीस उज्ज्वला मेहता, तिसरे बक्षीस अंकिता वेदपाठक
तर वेशभूषा स्पर्धेत पहिले बक्षीस स्वाती सुरवसे, दुसरे बक्षीस संध्या हेळकर व तिसरे बक्षीस अपर्णा पाथरूडकर यांना मिळाले. याप्रसंगी मान्यवरास तुकाराम महाराजांच्या गाथा देव सन्मान करण्यात आला प्रत्येक उपस्थित महिलेस राजमाता जिजाऊ अहिल्याबाई होळकर सावित्रीबाई फुले अशा थोर मातांची पुस्तके भेट देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड सविता शिंदे यांनी केले. आभार विजया कर्णवर यांना मानले. कार्यक्रमाचे वेळी बालसंगोपन योजनेचा लाभ मिळण्यासाठी १२ फॉर्म भरून घेण्यात आले. पंचायत समितीचे श्री. मस्तुद यांनी रोजगार निर्मिती बद्दल माहिती दिली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिजाऊ ब्रिगेड व लोकस्वराज प्रतिष्ठाण महिलांनी परिश्रम घेतले.

saptahikpawanputra

Recent Posts

गाव तिथे भाजपा, बूथ तिथे शाखा’ अभियानाला सोलापूर ग्रामीण पश्चिममध्ये सुरुवात संघटनात्मक बांधणीला वेग भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे यांनी पांडे व धायखिंडी येथे भाजपा शाखांचे उद्घाटन

  करमाळा प्रतिनिधी  : भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिमच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर जिल्हाध्यक्ष…

4 mins ago

प्राचार्य मिलिंद फंड यांना जीवनगौरव पुरस्कार पद्मश्री ‘बिजमाता’ राहिबाई पोपेरे यांच्या हस्ते सन्मान; वसंतराव दिवेकर स्मृतिदिनानिमित्त वसंत महोत्सव उत्साहात

करमाळा  प्रतिनिधी करमाळा येथील यशकल्याणी सेवाभवन येथे श्री. वसंतराव दिवेकर यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित ‘वसंत…

21 hours ago

करमाळ्यात झेडपी शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून सेमी-इंग्लिश अभ्यासक्रमाचा विस्तार;* प्रस्ताव सादर करण्याचे भाजप नेते दिग्विजय बागल यांचे आवाहन

  करमाळा प्रतिनिधी, करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये मराठी माध्यमासोबत इयत्ता पहिलीपासून सेमी-इंग्लिश अभ्यासक्रम…

1 day ago

करमाळ्यात श्री कमलाभवानी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवास भक्तिमय वातावरणात प्रारंभ! विधिवत घटस्थापना; सनई, ढोल, संबळ आणि झांजांच्या निनादात देवीची आरती संपन्न

  करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री कमला भवानी देवी मंदिरात शारदीय…

1 day ago

मुख्याधिकाऱ्यांच्या पत्रानंतर निदर्शन आंदोलन स्थगित- वैभवराजे जगताप.

करमाळा - प्रतिनिधी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक ८/१०/२०२६…

4 days ago