करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य को .ऑप . मार्केटींग फेडरेशन यांचेवतीने श्री .विठ्ठल सर्वसाधारण सह . संस्थेव्दारे करमाळा तालुक्यातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची सोय व वाजवी दाम मिळणेसाठी हमीभाव खरेदी केंद्र सुरु झाले असून शेतकर्यांनी त्याचा लाभ घ्यावा व आपले होणारे संभाव्यआर्थिक नुकसान टाळावे असे आवाहन करमाळा तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष शंभुराजे जगताप यांनी केले .आमदार संजयमामा शिंदे व माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रयत्नातून शासनाच्या किमानआधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत भरडधान्य हरभरा खरेदी साठी करमाळा येथे हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे . गुढीपाडवा व नूतन वर्षारंभाच्या मुर्हूतावर तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष शंभुराजे जगताप यांच्या हस्ते प्रत्यक्ष खरेदीचा शुभारंभ करण्यात आला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे माजी संचालक हनुमंत दादा बागल होते . यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दिपक शिंदे,बाजार समितीचे संचालक मयुर दोशी, सचिव विठ्ठल क्षीरसागर , सहाय्यक सचिव रविंद्र उकिरडे , प्रविण शिंदे गुरुजी , पत्रकार अशोक नरसाळे , बाळासाहेब बागल , संजय साळुंके यांचेसह शेतकरी उपस्थित होते . जास्तीत जास्त शेतकर्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी ,ऑनलाईन नोंदणीस ३१ मार्च पर्यंत मुदतवाढ मिळाल्याची माहिती यावेळी संस्थेचे सचिव सुजीत बागल यांनी प्रास्तविकात दिली . हरभर्याला हमीभाव दर प्रतिक्विंटल रुपये ५३३५/- इतका आहे . तरी शेतकर्यांनी शेतकरी तपशील फॉर्म, फोटो,ई पिक पाहणी नोंद असलेला ऑनलाईन ७ / १२ उतारा, ८ अ,पिकपेरा, आधार लिंक असलेले बँक पासबुक झेरॉक्स (आयएफएससी कोड स्पष्ट दिसत असलेले ), आधारकार्ड , मोबाईल नं .आदी कागदपत्रांसह संस्थेच्या करमाळा मार्केट यार्ड येथील सोलापूर डिसीसी बँकेशेजारील कार्यालयात ऑनलाईन नोंदणी करावी व हरभरा विक्रीस आणावाअसे आवाहन संस्थेचे व्यवस्थापक आदिनाथ मोरे यांनी केले आहे .
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…
करमाळा प्रतिनिधी छोटे छोटे भूखंड उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आपण विशेष प्रयत्न केले असून उद्योग…