करमाळा प्रतिनिधी शिवसेना कोणाची हा वाद अनेक महिन्यापासून महाराष्ट्रात चालू होता नुकताच निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि चिन्ह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिल्याने शिंदे गटातील शिवसैनिकात चैतन्य निर्माण झाले आहे. त्यामुळे मूळ शिवसेना शिंदे यांच्याकडे असल्याने करमाळा तालुक्यात युवा सेना तालुकाप्रमुख राहुल कानगुडे यांनी तालुक्यात झंजावती दौरा करून देवळाली खडकेवाडी रोशेवाडी गावात मराठी नववर्षाच्या निमित्ताने शाखा उद्घघाटन केले. याबाबत राहुल कानगुडे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की हिंदुरहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व आणि मराठी बांधवांसाठी शिवसेना स्थापन केली होती परंतु काही विघ्न संतोषी लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी शिवसेना ही काँग्रेस व राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना मूळ विचाराच्या पक्षासोबत स्थापन करून बाळासाहेबांचे विचार सत्यात उतरवले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बाळासाहेबांची शिवसेना पुन्हा घरोघरी पोहोचवण्यास सुरुवात केली आहे. गाव तेथे शाखा व घर तेथे शिवसैनिक निर्माण करण्यासाठी आम्हाला शिवसैनिक संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत सर माजी आमदार नारायण आबा पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे, युवा सेना जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे, युवा नेते पृथ्वीराज पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे. पुढे बोलताना राहुल कानगुडे म्हणाले की वैद्यकीय मदत कक्षातील कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्यामार्फत गरजूंना मोफत उपचार मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत लवकरच करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार असून सर्वच्या सर्व निवडणुका शिवसेना एक हाती जिंकून करमाळा मतदारसंघातील शिवसेनेची पकड मजबूत ठेवणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोकहिताच्या निर्णयामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याने रात्री झोपेतही शिंदे साहेबांचे विरोधी जप करण्यात ती व्यस्त आहे. मात्र शिंदे साहेब यांचा आदर्श घेऊन आम्ही नाहक वल्गणाकडे लक्ष न देता नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहोत. तसेच पक्ष कार्य करताना आम्हाला पंचायत समिती गहिनीनाथ ननवरे ,सतीश कानगुडे युवा जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे, ओतालुका उपप्रमुख लखन शिंदे,दादासाहेब तनपुरे,शहरप्रमुख विशाल गायकवाड,सुधीर आवटे आदींचे सहकार्य लाभत आहे.
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…
करमाळा: प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…