करमाळा प्रतिनिधी मध्य रेल्वेच्या माढा, जेऊर व केम या रेल्वेस्थानकावर आणखी तीन एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांना थांबा मिळाला आहे. यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून हे थांबे मिळाले आहेत, अशी माहिती भाजपचे करमाळा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी पत्रकारांना दिली आहे.
करमाळा तालुक्यातील केम व जेऊर येथे एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा अशी मागणी प्रवाशांची अनेक दिवसांपासून होती. या मागणीसाठी प्रवाशांचे आंदोलनेही झाली होती. याची गांभीर्याने दखल घेऊन खासदार निंबाळकर यांनी पाठपुरावा केला होता. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे हा पाठपुरावा केल्याने या रेल्वे एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळाला आहे. याशिवाय माढा रेल्वे स्थानकावर एका एक्सप्रेस गाडीला थांबा मिळाला आहे.
जेऊर रेल्वे स्थानकावर कोणार्क एक्सप्रेस या गाडीला तर केम रेल्वे स्थानकावर कन्याकुमारी एक्सप्रेस या रेल्वे गाडीला थांबा मिळाला आहे. माढा या रेल्वे स्थानकावर दादर सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस या गाडीला थांबा मिळाला आहे, अशी माहिती तालुकाध्यक्ष चिवटे यांनी दिली आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील नागरिकांची दिल्ली येथे काही कामे असतील तर नागरिकांनी संपर्क साधण्याचे आवाहनही चिवटे यांनी केले आहे.
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…