करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयच्या वतीने व इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स ॲन्ड रिसर्च, नवी दिल्ली प्रायोजित ‘योगा न्यूट्रीशन सायंटिफिक ट्रेनिंग मेथड्स् ॲन्ड रीहॅबिलीटेशन फॉर अॅव्हॉइडिंग अॅट्रक्शन ऑफ डोपिंग इन स्पोर्टस्’ या विषयावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथे दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद होणार आहे.24 व 25 मार्च अशी दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेचे उद्घाटन कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते होणार असून याचे उद्घाटन विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांच्या हस्ते होणार आहे. प्राचार्य मिलिंद फंड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या कुलसचिव डॉ. योगिनी घारे, परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. शिवकुमार गणापुरे, वित्त व लेखाधिकारी डॉ. श्रेणीक शहा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.या परिषदेमध्ये हैद्रबाद येथील डॉ. राजेशकुमार, डॉ.अभिनीत जगताप, डॉ. स्नेहल पेंडसे, डॉ. मनाली काने, डॉ. योगेश थोरात, डॉ. प्रदीप देशमुख, डॉ. शत्रुंजय कोठे हे भारतीय तर डॉ. गॅरी कुआन, मलेशिया आणि डॉ. अनोमा रत्ननायके, श्रीलंका हे परदेशी अभ्यासक शोध निबंध सादर करणार आहेत. अंमली पदार्थाचे सेवन अर्थात डोपिंग या गंभीर आणि महत्वपूर्ण विषयावर विचारमंथन करून उपाययोजनात्मक निष्कर्षाप्रत दिशादर्शन करणाऱ्या या परिषदेस देशभरातून 150 अभ्यासक उपस्थित राहणार असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर परिक्षेत्रातील सर्व क्रीडा विषयाचे अभ्यासक आणि प्राध्यापक वर्गाने सदर परिषदेमध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन सदर परिषदेचे समन्वक आणि यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. डॉ. अतुल लकडे यांनी केले आहे.
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…