सध्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने रस्ते विकास आराखडा 2021 ते 41 राबविला जात असून त्यासाठी प्रत्येक गावातील, वाडी – वस्तीवरील रस्ते प्लॅन मध्ये घेण्यासाठी रस्त्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू असून प्रत्येक ग्रामपंचायतींनी ,नागरिकांनी आपल्या गावातील, वाडी – वस्तीवरील जास्तीत जास्त रस्ते विकास आराखडा प्लॅन साठी नावे द्यावीत असे आवाहन आमदार संजयमामा शिंदे यांनी केले आहे.
प्रत्येक गावातील आणि वाडी वस्तीवरील रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी रस्ते प्लॅनमध्ये असणे आवश्यक असते. रस्ते प्लॅनमध्ये घेण्यासाठी त्याचा 20 वर्षाचा विकास आराखडा तयार केला जातो. त्यानुसार जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून सदर रस्त्यांचे सर्वे करून व शेतकऱ्यांची संमती घेऊन सदर रस्त्यांचा समावेश ग्रामीण मार्गामध्ये केला जात असतो.
महाराष्ट्र शासनाचा 2001 ते 2021 हा रस्ते विकास आराखडा यापूर्वी तयार करण्यात आलेला होता. 2021-22 हे वर्ष कोविड मध्ये गेल्यामुळे 2023 यावर्षीपासून 20 वर्षाचा रस्ते विकास आराखडा 2021 ते 2041 हा तयार केला जाणार असून त्यासाठी ग्रामपंचायत संमती असणे आवश्यक आहे .सदर रस्त्यांची यादी तयार झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून त्याचे नकाशे, ना हरकती, संमतीपत्र या आधारे सदर रस्त्यांना ग्रामीण मार्ग मिळवण्यासाठीचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे पाठविला जाईल त्यानंतर त्या रस्त्यांचा समावेश ग्रामीण मार्गामध्ये केला जाईल.
करमाळा प्रतिनिधी "वृत्तलेखन ही एक कला असून ते फक्त माहिती देणे एवढ्यापुरते मर्यादित राहिले नाही,…
करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…