·
करमाळा प्रतिनिधी
काॅग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांना जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षे शिक्षा व दंडाची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर करमाळयात काॅग्रेस पक्षाचे नेते सुनील बापु सावंत यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी दिनांक २७ मार्च रोजी सकाळी अकरा वाजता जेल भरो आंदोलन करण्यात येणार असुन सर्व काॅग्रेस प्रेमीनी या जेल भरो आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन काॅग्रेस पक्षाचे नेते सुनील बापु सावंत यांनी केले आहे
यावेळी पोलीस निरीक्षक करमाळा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,खासदार राहुल गांधी यांनी चोरी का सर नेम मोदी ही क्यों होता है या वक्तव्यावरून न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे खासदार राहुल गांधी यांना केंद्रातील भा जा प प्रणित मोदी सरकार घाबरत आहे त्यांच्या पायाखालची वाळु घसरत चालली आहें भारत जोडो पदयात्रेमुळे देशातील सर्व सामान्य जनतेच्या मनामध्ये खासदार राहुल गांधी यांच्या बद्दल आपुलकी निर्माण झाली आहे त्यामुळे भाजप सैरवैर झालेले दिसत आहे आणी म्हणुनच काॅग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांना कोणत्याही प्रकारे अडकवण्याचा हां डाव आहे लोकशाही वाचविण्यासाठी न्याय व्यवस्था आबादित राहण्यासाठी सर्व काॅग्रेस प्रेमीनी सोमवारी सकाळी अकरा वाजता जेल भरो आंदोलन सामील व्हावे असे आवाहन काॅग्रेस पक्षाचे नेते सुनील बापु सावंत यांनी केले आहे या दिलेल्या निवेदनावर काॅग्रेस पक्षाचे दस्तगीर पठान फारुक जमादार, औदुबर उबाळे, मझहर नालबंद, संभाजी गायकवाड़ राजेन्द्र वीर सिंकदर सय्यद राजेन्द्र कसाब आदी च्या सहया आहेत.
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…
करमाळा प्रतिनिधी छोटे छोटे भूखंड उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आपण विशेष प्रयत्न केले असून उद्योग…