माढा (प्रतिनिधी)
जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांचा करमाळा-माढा विधानसभा विधानसभा मतदारसंघातील करमाळा तालुक्यातील 118 व माढा तालुक्यातील करमाळा मतदार संघाला जोडलेली 36 गावांचा शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी गाव भेट दौरा नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जनशक्ती संघटनेचे संपर्कप्रमुख गणेश वायबासे यांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की करमाळा माढा विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी व त्यांना आलेल्या अडचणी सोडवण्यासाठी जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खूपसे पाटील व इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये गाव भेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. करमाळा तालुक्यामध्ये 118 व माढा तालुक्यातील करमाळा मतदार संघाला जोडलेल्या 36 गावांचे नियोजन बैठका लावण्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबत जनशक्ती संघटनेची टीम कार्यरत असणार आहे. तसेच त्या त्या वेळी आदल्या दिवशी कोणत्या दहा गावांचा दौरा केव्हा आणि किती वाजता आहे हे कार्यकर्त्यामार्फत कळवले जाईल. या दौऱ्याचे नियोजन दिनांक 28 मार्च 2023 ते 9 एप्रिल 2023 पर्यंत करण्यात आलेले आहे. या दौऱ्यामध्ये दररोज दहा गावातील शेतकऱ्यांचा मेळावा घेऊन त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यात येणार आहे. या अडचणीमध्ये तहसीलदाराकडून येणाऱ्या अडचणी नोंदीमध्ये तलाठ्याकडून येणाऱ्या अडचणी आरोग्य विषयी दवाखान्यासाठी येणाऱ्या अडचणी तसेच शेतकऱ्यांच्या उताऱ्यावरील असलेली तफावत घरकुला विषयी असलेल्या अडचणी या सर्व गोष्टीचा आढावा घेऊन करमाळा व माढा तालुका पंचायत समिती कार्यालयामध्ये त्या सोडवल्या जातील. यासंदर्भात शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा. आपल्या अडचणी थेट माझ्याशी कळवाव्यात अशी माहिती जनशक्ती संघटनेचे संपर्कप्रमुख गणेश वायबासे यांनी दिली आहे.
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…
करमाळा प्रतिनिधी छोटे छोटे भूखंड उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आपण विशेष प्रयत्न केले असून उद्योग…