Categories: करमाळा

पोथरेगावचे माजी सरपंच विष्णू रंदवे यांचा कार्यकर्ता ते सरपंच असा यशस्वी प्रवास 26 मार्च वाढदिवस विशेष लेख

विष्णू रंदवे यांचा जन्म एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबामध्ये झाला. शेती व्यवसायबरोबर आपला पारंपारिक व्यवसाय सांभाळून समाजकारणाच्या माध्यमातून राजकारणात यशस्वी वाटचाल करणारे यांचा प्रवास थक्क करणारा आहे .शिवसेना कार्यकर्ता म्हणून एडवोकेट शिवाजीराव मांगले यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात केली. शिवसेनेचे काम करत असतानाच स्व. दिगंबरराव बागल मामा यांचा समाजकारणाचा ध्यास असलेले नेतृत्व म्हणून त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन मामांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा विचार पक्का करून विष्णू रंदवे यांनी बागल गटाचे काम करण्यास सुरुवात केली. बागल गटाचा कार्यकर्ता म्हणून काम करताना सर्वसामान्य जनतेची कामे करत जनतेचा विश्वास संपादन केला.जनतेच्या आग्रहावास्तव सक्रिय राजकारणात सहभाग घेऊन ग्रामपंचायत निवडणुकीला पोथरे गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत उभा राहुन त्यांनी एकहाती विजय मिळवला. जनतेने त्यांना त्यांच्या कामाची पावती म्हणून पोथरे गावचे सरपंच म्हणून निवडून दिले सरपंच म्हणून काम करत असताना गावातील रस्ते, पाणी, वीज, जनतेची कामे करत गावाला विकासाच्या वाटेवर नेण्याचे काम विष्णू रंदवे यांनी केले आहे. माणूस परिस्थितीनेच मोठा असून चालत नाही तर सर्वसामान्य जनतेचे पाठबळ घेऊन जनसामान्यांच्या पाठबळावर नेतृत्व तयार असते नेतृत्व तयार होत असते अशाच प्रकारे विष्णू रंदवे एका सर्व सामान्य कुटुंबामध्ये जन्म घेऊन आपल्या प्रपंचाचा गाडा उडत असताना केवळ आपल्या कुटुंबाचा विकासाचा ध्यास न घेता गावाचा विकास झाला पाहिजे या भावनेतून प्रेरित होऊन त्यांनी समाजकारणात व राजकारणात काम केले. सध्या ते जेष्ठ वृद्ध निराधार अपंग लोकांना संजय गांधी योजना श्रावण बाळ योजना यांच्या माध्यमातून शासकीय मदत मिळवून देण्यासाठी काम करत आहेत. या वयातही त्यांचा उत्साह युवकाला लाजवणारा आहे. कुणाची कसली काम असू द्या लोकांमध्ये असणारा सर्वसामान्यांना आपलेसे करून निरपेक्षेपणे लोकसेवा करणारे विष्णू रंदवे यांचे काम नक्कीच आजच्या युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे. हजारो निराधार जेष्ठ लोकांना संजय गांधी श्रावण बाळ योजनेच्या माध्यमातून मासिक मानधन सुरू करून त्यांच्या उपजीविकाला एक आधार देण्याचे काम त्यांनी केले असल्यामुळे त्यांचा आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे विष्णू रंदवे या वृध्द काळातही सुखी संपन्न व आरोग्य संपन्न आयुष्य जगत आहे. त्यांना दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे सदैव हसतमुख आपल्या कामांमध्ये व्यस्त राहून लोकांसाठी काम करणारे सर्व गटाबरोबर जिव्हाळयाचे संबध असलेले अष्टपैलु व्यक्तिमत्व असलेले विष्णू रंदवे यांचा 26 मार्च रोजी वाढदिवस असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त सायंकाळी सात वाजता ग्रामस्थांच्यावतीने नागरी सत्कार स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. जनसामान्यातून लोककल्याण करण्याचे ध्येय उराशी बाळगून काम करणाऱ्या ज्येष्ठ नेते पोथरे गावचे माजी सरपंच विष्णू रंदवे यांना वाढदिवसाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

7 hours ago

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

2 days ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

2 days ago

पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांचा सहकुटुंब सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील‌ उद्योजक क्लासिक कंपनीचे ‌ मालक ‌ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…

2 days ago

निमगाव (ह )येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर अल्पदरात चष्म्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…

3 days ago