पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना संबोधन केले यावेळी मार्च 2023 मध्ये 99 वा मन की बात कार्यक्रम प्रक्षेपण जेऊर मध्ये संपन्न झाला यावेळी आनंद मोरे ,पवन कोठारी, नरेंद्रसिंह ठाकुर ,दिनेश देशपांडे ,नानासाहेब मोरे( शेटफळ ) सतीश आदलिंग, सुनील कुलकर्णी महादेव वाघमोडे ,राहुल माळवे आदी उपस्थित होते…
एप्रिलमध्ये होणाऱ्या शंभराव्या मन की बात कार्यक्रमाकडे संपूर्ण देशवासीयांचे लक्ष लागलेले आहे यासाठी आपल्या सूचना आपले उपक्रम जरूर कळवावेत असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे शंभरव्या मन की बात कडे वाटचाल चालू आहे आज पर्यंतच्या मन की बात कार्यक्रम मध्ये हजारो लोकांबरोबर संवाद साधला आहे विशेषता दुसऱ्याबद्दल समर्पण भाव ज्यांच्याकडे आहे असे महान व्यक्तिमत्व आपण पाहिले आहे पर्यावरण मुलींचे शिक्षण अशा उपक्रमासाठी आपलं सर्वस्व दान करणारे अनेक दाते आपण पाहिलेले आहेत आज भारतामध्ये देहदान ऑर्गन डोनेशन उपक्रम मोठ्या प्रमाणात यशस्वी होताना दिसत आहे देहदान मुळे आठ ते नऊ व्यक्तींना जीवदान मिळते मागील काही आकडे पाहिल्यास याबाबत जनमानसात जागरूकता दिसून येते 2013 मध्ये 5000 पेक्षा कमी लोकं अवयव दान करत होते पण20 22 मध्ये 15000 पेक्षा जास्त लोकांनी हे पुण्य कार्य केले आहे याबाबत सुखदेव सिंग व सुप्रीत कोर अमृतसर पंजाब यांची मुलगी अबाबत या 39 दिवसाच्या मुलीचे अवयदान केले आहे त्यांच्या पालकांबरोबर संवाद साधला त्याचबरोबर झारखंड येथील स्नेहलता चौधरी वय 65 यांच्या मृत्यूनंतर हात, किडनी, लिव्हर ,डोळे हे दान केले याबाबत त्यांची चिरंजीव अभिजीत चौधरी यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला याबाबत जाचक अटी रद्द केल्या जात असून आता कोणत्याही राज्यांमध्ये जाऊन याबाबत रजिस्ट्रेशन करता येईल तसेच 65 वर्ष वयाची अटी शिथिल करण्यात येत आहे अवयव दानबाबत ऋषी परंपरेतील शिवी व दधिची यांचा आदर्श आहेच
सध्या चैत्र नवरात्र सुरू आहे नारीशक्तीचा सन्मान देशांमध्ये होताना दिसत आहे आशिया ची पहिली महिला लोको पायलट सुरेखा यादव या वंदे भारत एक्सप्रेस चे सारथ्य करत आहेत, तसेच एलिफंट विस्परस या डॉक्युमेंटरीला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे, तसेच भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरच्या ज्योतिर्मय मोहनतजी यांना केमिस्ट्री व केमिकल इंजिनिअर मध्ये विशेष ऑवार्ड मिळाला आहे तसेच महिला वर्ल्ड कप क्रिकेट मध्ये महिलांची यशस्वी बाजी ,तसेच नागालँड येथील विधानसभेमध्ये दोन महिला प्रथमच विधानसभेत पोहोचले आहेत त्यामधील एक महिला मंत्री देखील झाल्या आहेत .
तुर्की भूकंप दरम्यान एनडीआरएफ महिलांची टीमने यशस्वी काम केले आहे ,भारताच्या तिन्ही दलामध्ये महिलांचे यशस्वी कारकीर्द आहे
ग्रुप कॅप्टन वायुसेनेमध्ये शालीज धामी यांनी वायुसेना मध्ये 3000 तासांचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे ,तसेच भारतीय सेना मध्ये महिला कॅप्टन म्हणून सीमा चौहान या काम करत आहे सियाचीन मध्ये पारा साठ डिग्री पर्यंत असताना त्यांना सलग तीन महिने तेथे तैनात केलेले आहे ,या महिला शक्तीमुळे विविध क्षेत्रे दैदिप्यमान होताना दिसत आहेत…. नैसर्गिक सूर्य शक्तिपासून ऊर्जेचे बचत सोलर एनर्जी च्या रूपाने देशांमध्ये विविध राज्या – राज्यांमध्ये दिसत आहेत, महाराष्ट्रातील पुणे येथील सोसायटीमध्ये सोलर पॅनल बसविण्यात आल्यामुळे सुमारे 90 हजार किलो वॅट वीज तयार होत असून प्रत्येक महिने 40 हजार पर्यंत बचत होत आहे तसेच दमन दिव येथील दिव येथे सोलर पॅनल मुळे पूर्ण गाव विकसित झाले असून माळरानही नंदनवन झाले आहे असेच म्हणावे लागेल यामुळे पर्यावरणाचे रक्षण होत आहे तसेच यामुळे सुमारे 52 कोटी रुपये ची बचत होताना दिसत आहे याचे लोण दिवसेंदिवस पसरत आहे …….
संस्कृती व संस्कृती महोत्सवाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास वाराणसी मथ्ये नुकताच काशी = तमिल महोत्सव संपन्न झाला तर 17 ते 30 एप्रिल दरम्यान गुजरात मध्ये
सौराष्ट्र= तमिल उत्सव संपन्न होणार आहे …यामुळे एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेतून संवादाचा धागा अजून मजबूत होताना दिसत आहे
अशा विविध विषयावर पंतप्रधानांनी संवाद साधला
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…