Categories: करमाळा

कार्तिक चांदणे या तरुणाच्या उपचारासाठी सोशल मीडियावर आवाहन केल्यानंतर सामाजिक बांधिलकी जपत चार तासात चाळीस हजार आईच्या खात्यावर मदत जमा

 

उमरड प्रतिनिधी उमरड ता करमाळा येथील मोटारसायकल आपघातात गंभीर जखमी असलेल्या कार्तिक चांदणे या तरुणाच्या उपचारासाठी मदतीची गरज. सामाजिक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर आवाहन केल्यानंतर सामाजिक बांधिलकी जपत चार तासात चाळीस हजार त्याच्या आईच्या खात्यावर चाळीस हजार रूपये मदत जमा झाली आहे. .
येथील कार्तिक अंगद चांदणे या एकोणीस वर्षीय तरूणाचा पंधरा दिवसांपूर्वी कुंभेजफाटा परिसरात मोटारसायकल ॲक्सिडेंट झाला यामध्ये त्याला जबर मार लागल्याने पुणे येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी पाठवले होते.आठ दिवस त्याची शुद्ध हरपलेल्या अवस्थेत उपचार सूरू होते सध्या या तरुणाची प्रकृती सुधारत आहे. या तरूणाचे वडील मजुरी करतात तर आई अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करते जमीन किंवा आर्थिक उत्पन्नाचे खात्रीशीर साधन नसल्याने परिस्थिती हालाकिची आहे.त्यांच्या जवळील व नातेवाईकांनी दिलेले बरेच पैसे उपचारासाठी खर्च झाले आहे.मुख्यमंत्री वैद्यकीय साह्यता कक्षाकडे सहकार्याची मागणी केली आहे तरीही उपचारासाठी खर्च मोठा असल्याने उमरड येथिल सामाजिक कार्यकर्ते प्रा.नंदकिशोर वलटे यांनी या तरूणांच्या उपचारासाठी आज सकाळी मदत करण्याचे आवाहन सोशल मीडियावरून केल्यानंतर सामान्य लोकांमधून अवघ्या चार तासात पाचशे हजार रूपयांच्या माध्यमातून चाळीस हजार रुपये मदत त्यांच्या आईच्या 9557696172 या फोन पे नंबर वरून बॅंक खात्यावर जमा झाली आहे मदतीचा ओघ सुरू असून या निमित्ताने परिसरातील लोकांच्या माणुसकीचे दर्शन घडत आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

21 hours ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

2 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

2 days ago