Categories: करमाळा

करमाळा एसटी डेपो मध्ये करमाळा कोल्हापूर गाडीचे जल्लोषात स्वागत

करमाळा प्रतिनिधी 
महाराष्ट्रातला तमाम भाविक भक्त चैत्र महिन्यामध्ये ज्योतिबाच्या दर्शनासाठी जात असतो करमाळा तालुक्यामधील ही अनेक भाविक भक्त दर्शनासाठी जातात परंतु ,थेट गाडी नसल्यामुळे महिला, वयोवृद्ध यांना गैरसोय होत होती परंतु करमळा आगाराने आज पासून करमाळा- कोल्हापूर गाडी सुरू केल्यामुळे भाविकांची सोय होणार आहे असे मत करमाळा पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांनी व्यक्त केले ,यावेळी आगार प्रमुख अश्विनी किरगत या उपस्थित होत्या भाजपा माजी शहराध्यक्ष संजय अण्णा घोरपडे यांनी गाडी चालू करण्याबाबत निवेदनाद्वारे मागणी केली होती
पुढे बोलताना गुंजवटे म्हणाले की जे आर्थिक सधन आहेत ते वाहनांनी जाऊ शकतात ,परंतु मध्यमवर्गी कुटुंबांना एसटी सोयीची ठरते महिला असोत ज्येष्ठ नागरिक असो यांची सोय होणार आहे
सुट्टीच्या काळामध्ये वाहन व्यवस्था अपुऱ्या असतात त्यामध्ये करमळा आगाराने करमाळा कोल्हापूर ही गाडी सुरू करून करमाळा शहर व तालुक्यातील प्रवाशांसाठी चांगली सोय केलेली आहे करमळा आगाराचे काम सोलापूर जिल्ह्यात उल्लेखनीय आहे ही तुम्हा आम्हा सर्वांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे
यावेळी संजय घोरपडे, अमरजीत साळुंखे यांनी आपले विचार व्यक्त केले प्रास्ताविक नरेंद्रसिंह ठाकूर यांनी केले यावेळी चालक पवार व वाहक काळे यांचाही सत्कार करण्यात आला…
या कार्यक्रमास भाजपा तालुका सरचिटणीस अमरजीत साळुंखे, श्रीरामचंद्र बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष जयंत दळवी ,नंदन प्रतिष्ठानचे अध्यक्ष जितेश कटारिया, भाजपा महिला आघाडीच्या नेत्या आनंदीताई दिघे पाटील, बळीराजा शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष अण्णा सुपनर, रासप जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते, अतुल बोकन ,सुशील राठोड , आळजापूर चे परमेश्वर काळे करमाळा चौफेर चे संपादक शाहूदादा फरतडे ,वाहतूक नियंत्रक करण मुसळे, वाहतूक नियंत्रक सोमनाथ नवले, एटीएस एस व्ही कदम, जीए अरुण घोलप ,एसटी कामगार नेते विजय खटके करमाळा आगारातील चालक ,वाहक, कर्मचारी आदी उपस्थित होते निवेदनाच्या मागणीप्रमाणे करमाळा कोल्हापूर तसेच बारामती मार्गे करमाळा सातारा या दोन्ही गाड्या सुरू केल्याबद्दल संजय घोरपडे यांनी आभार व्यक्त केले…

saptahikpawanputra

Recent Posts

प्राचार्य मिलिंद फंड यांना जीवनगौरव पुरस्कार पद्मश्री ‘बिजमाता’ राहिबाई पोपेरे यांच्या हस्ते सन्मान; वसंतराव दिवेकर स्मृतिदिनानिमित्त वसंत महोत्सव उत्साहात

करमाळा  प्रतिनिधी करमाळा येथील यशकल्याणी सेवाभवन येथे श्री. वसंतराव दिवेकर यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित ‘वसंत…

19 hours ago

करमाळ्यात झेडपी शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून सेमी-इंग्लिश अभ्यासक्रमाचा विस्तार;* प्रस्ताव सादर करण्याचे भाजप नेते दिग्विजय बागल यांचे आवाहन

  करमाळा प्रतिनिधी, करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये मराठी माध्यमासोबत इयत्ता पहिलीपासून सेमी-इंग्लिश अभ्यासक्रम…

23 hours ago

करमाळ्यात श्री कमलाभवानी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवास भक्तिमय वातावरणात प्रारंभ! विधिवत घटस्थापना; सनई, ढोल, संबळ आणि झांजांच्या निनादात देवीची आरती संपन्न

  करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री कमला भवानी देवी मंदिरात शारदीय…

1 day ago

मुख्याधिकाऱ्यांच्या पत्रानंतर निदर्शन आंदोलन स्थगित- वैभवराजे जगताप.

करमाळा - प्रतिनिधी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक ८/१०/२०२६…

4 days ago

भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिमची करमाळा येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात संपन्न पदयात्रेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

  करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…

5 days ago