करमाळा प्रतिनिधी
करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आ. संजयमामा शिंदे यांनी 2023 वर्षाच्या प्रारंभीच संपूर्ण करमाळा माढा विधानसभा मतदारसंघातील गावे आणि वाडीवस्ती वरती गाव भेट दौऱ्याच्या आयोजन केलेले होते. सदर गावभेट दौरा कोर्टी गावासाठी विशेष महत्त्वाचा ठरल्याची माहिती कोर्टी चे माजी उपसरपंच सुभाष अभंग यांनी दिली .
याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की,
देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब ज्यावेळेस लोकसभा निवडणुकीसाठी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे राहिलेले होते त्यावेळेस रस्त्याच्या मागणीसाठी कुस्करवाडीने निवडणुकीवरती बहिष्कार टाकलेला होता. दुरावस्था असलेल्या या रस्त्यावरून आमदार संजय मामा शिंदे कुस्करवाडीच्या भेटीसाठी आले त्यावेळेस रस्त्याची दुरावस्था पाहून त्यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या 30 54 हेड मधून सदर रस्त्यासाठी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर केला.
कोर्टी हे गाव 12 वाडी वस्तीने मिळून बनलेले आहे .यापैकीच गोरेवाडीला भेट दिली असता तेथील जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था पाहून 1 नवीन वर्ग खोली बांधकामासाठी 9 लाख 98 हजार रुपयांचा निधी आमदार संजय मामा शिंदे यांनी मंजूर केला .एकूणच आमदार संजय मामा शिंदे यांचा गाव भेट दौरा कोर्टी गावासाठी फलदायी ठरला असून कुस्करवाडी आणि गोरेवाडी या वाडीवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न सुटण्यास मदत झालेली आहे.
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील यशकल्याणी सेवाभवन येथे श्री. वसंतराव दिवेकर यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित ‘वसंत…
करमाळा प्रतिनिधी, करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये मराठी माध्यमासोबत इयत्ता पहिलीपासून सेमी-इंग्लिश अभ्यासक्रम…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री कमला भवानी देवी मंदिरात शारदीय…
करमाळा प्रतिनिधी : यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्था, पुणे (शाखा करमाळा) यांच्या वतीने संस्थेचे संकल्पक…
करमाळा - प्रतिनिधी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक ८/१०/२०२६…
करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…