करमाळा तालुक्यातील हिवरवाडीमध्ये साजरा झाला विधवा सन्मान सण*


करमाळा( हिवरवाडी) दि.२९/०३/२०२३- येथील हिवरवाडी ग्राम पंचायतीच्या वतीने विधवा सन्मान सणाचे आयोजन करून समाजापुढे एक नवीन आदर्श निर्माण केला आहे. या आगळ्या वेगळ्या आणि अभिनव सणाच्या निमित्ताने हिवरवाडीच्या सरपंच अनिता बापूराव पवार, युवाकार्यकर्ती सुप्रिया पवार यांनी विधवा प्रथा बंद करा हे पथनाट्य तसेच मुधोजी कॉलेजचे माजी प्राचार्य सुधीर इंगळे, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे(+२ स्तर) जिल्हा समन्वयक प्रा. लक्ष्मण राख आणि कला व वाणिज्य महाविद्यालय, माढा येथील मराठी विभाग प्रमुख डॉ संगीता पैकेकरी यांच्या मागदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी हिवरवाडी येथील विधवांना समारंभपूर्वक ओवाळून हळदी कुंकू देवून त्यांना मिठाई देण्यात आली तसेच “विधवा प्रथा” असे लिहिलेले कागद मेणबत्तीवर जाळून हिवरवाडी ग्रामस्थांनी विधवा प्रथा कायमची बंद करण्याचा निर्धार व्यक्त केला. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील प्रा. प्रदीप मोहिते यांनी एका व्हीडीओ क्लीपद्वारे केलेल्या आवहनास अनुसरून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाच्या संयोजक सुप्रिया पवार यांनी केले. सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
या प्रसंगी अशा प्रकारचा सण आणि विधवा प्रथा बंदीचा निर्धार राज्यातील कदाचित पहिलाच सण असावा असे मत प्रा. लक्ष्मण राख यांनी व्यक्त केले तर इथून पुढे दैनंदिन जीवनात विधवांना सन्मानाने वागवले जावे अशी अपेक्षा डॉ. संगीता पैकेकरी यांनी बोलून दाखविली. प्राचार्य सुधीर इंगळे यांनी इतिहासातील राष्ट्रमाता जिजाऊ आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी वैधव्यावर मात करून इतिहासाला भरीव योगदान दिल्याची आठवण करून दिली आणि त्यांचा आदर्श समोर ठेवण्याचे आवाहन केले.
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून विधवा प्रथेचे उच्चाटन करणे आवश्यक असल्याचे प्रभावी सादरीकरण केले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मधुकर पवार, बिभीषण सांगळे, आल्फिया शेख, राम गोडगे, अमृता आरणे, रिया परदेशी, साक्षी बोबलट, संगीता गोविंद पवार, जावेद मुलाणी.  विद्या गावडे साक्षी पठाडे किरण सातव यांनी विशेष परिश्रम घेतले.

saptahikpawanputra

Recent Posts

भारतरत्न माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देवळाली येथे नेत्ररोग तपासणी संपन्न

करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…

10 hours ago

अवैध वाळु उपसा बंद करा आमदार नारायण पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पञ

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…

11 hours ago

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

2 days ago

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

3 days ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

4 days ago

पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांचा सहकुटुंब सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील‌ उद्योजक क्लासिक कंपनीचे ‌ मालक ‌ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…

4 days ago