करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांमध्ये बुधवार दिनांक 29/03/2023 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने ” इफेक्ट्स ऑफ ग्रीन रिव्होल्यूशन ऑन इंडिजिनस क्रॉप्स अॅण्ड इटस् इंपॅक्ट ऑन इंडियन इकॉनॉमी वुईथ इटस् हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड “या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न झाले. या चर्चासत्राचे उद्घाटन विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे (सर) ,अध्यक्ष मा. मिलिंद फंड , प्रा. डॉ. सरदार पाटील ,डॉ.काशिनाथ चव्हाण, प्राचार्य डॉ. लक्ष्मण पाटील, डॉ.विष्णू वाघमारे , डॉ. अनिल साळुंखे, सहसचिव बाळासाहेब सुर्यवंशी,संस्थेचे विश्वस्त लेफ्टनंट प्रा. संभाजी किर्दाक या मान्यवरांच्या उपस्थित झाले. पहिल्या सत्रामध्ये डॉ. विष्णू वाघमारे हे अध्यक्ष तर डॉ. सरदार पाटील हे साधन व्यक्ती होते. त्यांनी शाश्वत शेती विकास ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. त्याचबरोबर पहिल्या हरितक्रांतीचे अनुकूल व प्रतिकूल परिणाम यासह संबंधित विषयावर सखोल असे विवेचन त्यांनी केले. या सत्रांमध्ये साधन व्यक्तीचा परिचय डॉ.विजया गायकवाड यांनी तर आभार प्रा.सरला चव्हाण यांनी मानले .
दुसऱ्या सत्रामध्ये डॉ. शोभा खंदारे या अध्यक्षा व डॉ.काशिनाथ चव्हाण हे साधन व्यक्ती होते.त्यांनी आपल्या भाषणात दुसऱ्या हरितक्रांतीची गरज व प्रसार या विषयावर सखोल असे विवेचन केले. साधन व्यक्तीचा परिचय डॉ. अंकुश करपे यांनी व आभार डॉ. ज्ञानेश्वर सुपेकर यांनी मानले. तिसऱ्या सत्रांमध्ये संशोधन पेपरचे सादरीकरण झाले. या चर्चासत्रासाठी देशातील विविध राज्यासह महाराष्ट्रातील प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.या चर्चासत्राचे सूत्रसंचालन प्रा.विष्णु शिंदे यांनी व कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.कृष्णा कांबळे यांनी मानले. राष्ट्रगीताने या चर्चासत्राचा समारोप झाला. हे चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी संपूर्ण यशवंत परिवारातील सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले .
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…