5 जानेवारी 2023 पासून दहिगाव उपसा सिंचन योजनेचे रब्बी आवर्तन टेल टू हेड प्रमाणे सुरू झालेले असून सदर रब्बी आवर्तन 28 फेब्रुवारी रोजी संपणे अपेक्षित असतानाही ते आवर्तन अद्यापही सुरूच आहे. हेडकडील काही गावे अद्यापही रब्बी आवर्तनापासून वंचित आहेत.सदर गावांना 10 एप्रिल पर्यंत पाणी देण्याचे नियोजन असून दिनांक 11 एप्रिल पासून दहिगाव उपसा सिंचन योजनेचे उन्हाळी आवर्तन टेल टू हेड याप्रमाणे सुरू होईल अशी माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.
दिनांक 11 ते 14 एप्रिल रोजी टेल चारीने घोटी आणि मलवडी , दिनांक 15 ते 16 एप्रिल उजवी चारी क्रमांक 11 या चारीने निंभोरे ,दिनांक 17 ते 22 एप्रिल रोजी चारी क्र.6 वरून घोटी, वरकुटे, साडे आळसुंदे, दिनांक 23 ते 24 एप्रिल रोजी उजवी चारी क्रमांक 10 वरुन निंभोरे, दिनांक 25 ते 30 एप्रिल रोजी उजवी चारी क्रमांक 9 या चारीवरून निंभोरे व लव्हे ,दिनांक 1 मे ते 4 मे डावी चारी क्रमांक 4, थेट विमोचक 3 यावरून साडे व कोंढेज तलाव, दिनांक 5 ते 6 मे रोजी डावी चारी क्रमांक 3 वरून सौंदे ,साडे,फीसरे, सालसे ही गावे, दिनांक 7 ते 10 मे रोजी डावी चारी क्रमांक 1, उजवी चारी क्रमांक 6 व थेट विमोचक क्रमांक 1 वरून गुळसडी, कुंभेज, सरपडोह , शेलगाव क ही गावे तर दिनांक 11 ते 13 मे उजवी चारी क्रमांक 2 व देवळाली वितरीका यावरून देवळाली ,पांडे ,खडकेवाडी या गावांना पाणी मिळेल.
चौकट –
शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरून सहकार्य करावे – संजय अवताडे. उपअभियंता.
दहिगाव उपसा सिंचन योजना ही 2 टप्प्यातील उपसा सिंचन योजना असून या योजनेचे किमान विज बिल भरणा करण्यात इतपत पाणीपट्टी सध्या शेतकऱ्यांकडून आकारली जात आहे. ही पाणीपट्टी भरून शेतकऱ्यांनी सहकार्य करावे . दहिगाव योजना उन्हाळी आवर्तनाचे वेळापत्रक जाहीर केलेले असले तरी लाईन ट्रिप होणे, पंप प्रॉब्लेम, एअर वॉल लिकेज या तांत्रिक बिघाडामुळे वेळापत्रकामध्ये बदल होऊ शकतो याची नोंद शेतकऱ्यांनी घ्यावी.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…