करमाळा प्रतिनिधी मन्वंतर सामाजिक संस्थेतर्फे दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार अहमदनगर महाविद्यालयाचे इतिहास विभागाचे प्राध्यापक डॉ. सचिन मोरे यांना नुकताच प्रदान करण्यात आला. प्राध्यापक डॉक्टर सचिन मोरे हे माजी नगराध्यक्ष श्री ज्ञानेश्वर मोरे सावंत गल्ली करमाळा यांचे सुपुत्र आहेत. ज्येष्ठ समाजसेवक आणि नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड महाराष्ट्र युनिट महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री रामेश्वर कलंत्री यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गेल्या 17 वर्षापासून अध्यापनाच्या क्षेत्रात कार्यरत असणारे डॉक्टर सचिन मोरे बहुजन आणि दिव्यांग मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करतात. या कार्याबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. यावेळी राज्य हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक डॉक्टर साताप्पा चव्हाण आणि मन्वंतर चे अध्यक्ष आणि ना .य डोळे या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित असलेले प्रोफेसर डॉक्टर विजय कदमही उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉक्टर सचिन मोरे म्हणाले की कामाची दखल घेऊन कौतुक करण्यासाठी मोठ्या मनाची गरज असते. त्यासाठी मनाची श्रीमंती महत्त्वाची ठरते तसेच बहुजन आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहातील शिक्षणाचा मूलभूत अधिकार आहे.
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…