जगदगुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांचे कार्य दीपस्तंभासारखे लवकरच नरेंद्रमहाराजांचा प्रवचनाचा कार्यक्रम होणार संप्पन- श्रेणिकशेठ खाटेर

 करमाळा प्रतिनिधी हिंदु धर्माला आलेली ग्लानी आपल्या मधुर वाणीने दुर करुन देव देश धर्मासाठी अध्यात्माच्या माध्यमातुन लाखो भाविकांना जीवन जगण्याची नवी दिशा देणारे जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज यांचे कार्य दिपस्तंभासारखे असल्याचे मत भागवत कथा ज्ञानयज्ञ समिती अध्यक्ष सामाजिक कार्यकर्त श्रेणिकशेठ खाटेर यांनी व्यक्त केले. पुढे बोलताना ते म्हणाले की जगदगुरू नरेंद्रमहाराज यांच्या अध्यामिक,सामाजिक धर्म कार्याबद्दल ऐकुन होतो. त्यांच्या सहवासाचा दर्शनाचा लाभ घेऊन जीवन धन्य झाले करमाळा शहरामध्ये प्रवचन दर्शनाच्या कार्यक्रमासाठी नरेद्रंमहाराजानी येऊन आम्हाला उपकृत करावे अशी विनंती आम्ही महाराज त्यांचे स्विय सहाय्यक महेश परबसाहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. भागवत कथा ,रामकथा,शिवमहापुराण कथा धार्मिक कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले असल्याचे महाराजांना सांगितले व सोलापुर जिल्हयात करमाळा तालुका तुमच्या प्रवचन दर्शनाच्या कार्यक्रमापासुन वंचित राहिला असुन भागवत कथा समिती नरेंद्रमहाराज भक्त सेवा मंडळाच्या माध्यमातुन हा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे सांगितले. तुमच्या विनंतीनुसार उपलब्ध वेळ व तारखेनुसार करमाळयाला प्रवचन दर्शन कार्यक्रमाची तारीख देण्याची विनंती केली आहे. .यावेळी भागवत कथा ज्ञानयज्ञ समिती अध्यक्ष सामाजिक कार्यकर्त श्रेणिकशेठ खाटेर जगद्गुरू नरेंद्राचार्य भक्त सेवा मंडळाचे मा. तालुकाध्यक्ष पत्रकार दिनेश मडके, पतंजली योग समितीचे हनुमानसिंग परदेशी, सामाजिक कार्यकर्ते चरणसिंग परदेशी, संतोष विटकर यांनी महाराजांचे दर्शन घेऊन कार्यक्रमाची तारीख देण्याची विनंती केली यावर जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांनी सदर कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले असून आपणच लवकरच तुमच्या करमाळयाला प्रवचन कार्यक्रम देऊ असे सांगितले करमाळा तालुक्यात सर्वाच्या सहकार्यातुन नरेंद्रमहाराजांचा प्रवचनाचा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरुपात घेण्यात येणार असल्याचे मत भागवत कथा ज्ञानयज्ञ समिती अध्यक्ष सामाजिक कार्यकर्त श्रेणिकशेठ खाटेर यांनी व्यक्त केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा येथील सेवानिवृत्त नगरपालिका कर्मचारी मोहम्मद खान यांचे निधन

करमाळा प्रतिनिधी  करमाळा येथील सेवानिवृत्त नगरपालिका कर्मचारी हाजी मोहम्मद महेबूब खान पठाण उर्फ खान चाचा…

3 hours ago

*स्व.काकासाहेब थोबडे चषकाचे उपविजेते होत करमाळा वकील संघाने केली दमदार कामगिरी

करमाळा प्रतिनिधी- सोलापुर येथे चालु असलेल्या स्व. काकासाहेब थोबडे चषकामधे करमाळा वकील संघाने दमदार कामगिरी…

24 hours ago

प्राध्यापक डॉ. शरद जाधव यांना संगणकशास्त्राची पीएचडी पदवी

  करमाळा प्रतिनिधी  भालेवाडी (ता. करमाळा) येथील रहिवासी तथा महात्मा गांधी ज्युनिअर कॉलेज, करमाळा येथे…

1 day ago

जिल्हा दिव्यांग अधिकारी दक्षिण सोलापूरचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांची मुकबधीर शाळेला भेट दिव्यांग विद्यार्थ्यांसमवेत अधिकाऱ्यांचे जेवण

करमाळा प्रतिनिधी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी पदाचा नुकताच पदभार स्वीकारलेले दक्षिण सोलापूरचे गटविकास अधिकारी मनोज…

1 day ago

एन.सी.सी. हे देशसेवा व करिअर घडवण्याचे माध्यम’ -विलासरावजी घुमरे

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय मध्ये एनसीसी विभागातर्फे आर्मी, वायुसेना, पोलीस भरती इत्यादी…

2 days ago