करमाळा प्रतिनिधी – संपुर्ण जगभरामध्ये कोरोना या रोगाने थैमान घातले आहे. या रोगामुळे सर्व जनता आर्थिक अडचणीत आले आहेत. आपल्या शहरातील अनेक उद्योग या रोगामुळे बंद राहिले, छोटे उद्योग करणाऱ्या लोकांवर सध्याच्या परिस्थितीत उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून शहरातील कोणत्याच उद्योगांना म्हणावे तसे उत्पन्न मिळाले नाही, ही बाब लक्षात घेऊन करमाळा नगरपालिकेने आपल्या गाळेधारकाचे चार महिन्याचे भाडे व एक वर्षाची घरपट्टी माफ करीत सामाजिक बांधिलकी जपावी अशी विनंती करमाळा नगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक सचिन घोलप यांनी केली आहे.
करमाळा शहरात ग्रामीण भागातील लोक मोठ्या प्रमाणावर येऊन वस्तू खरेदी करीत असतात. त्यामुळे येथील गाळेधारकाचा व्यवसाय होत असतो. मागील चार ते पाच महिन्यापासून कोरोनाचे संकट लक्षात घेता सरकारने अनेक निर्बंध लोकांवरती लावल्यामुळे लोकांची रेलचेल पूर्णपणे बंद झाली आहे. लाॅकडाउनच्या काळात अतिआवश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. यामध्ये छोटे उद्योग करणा-यांचे हातावर पोट आहे. करमाळा नगरपालिकांने सर्व गाळेधारकांना चार महिन्याचे गाळेभाडे व एक वर्षाची घरपट्टी रद्द करुन दिलासा द्यावा मुळात या गाळेधारकांचा व्यवसायाच नाही तर पैसे येणार कोठून हे ही बघावे. कोरोनाच्या या संकटामुळे या गाळेधारकांना परत आपल्या व्यवसायात जम बसवावे लागेल. लोकांमध्ये भितीची वातावरण असल्यामुळे लोक बाहेर पडण्यास तयार नाहीत तर या गाळेधारकांचा व्यवसाय कसा होणार हा प्रश्न आहे. सरकारने नुकतीच हाॅटेल, चहाची दुकाने यांना परवानगी दिली असली तरी काही अटी घातल्या आहेत. त्यामुळे या व्यवसायावर परिणाम होणार आहे. नगरपालिकेने आपली सामाजिक बांधिलकी जपत या गाळेधारकांना चार महिन्याचे भाडे व एक वर्षाची घरपट्टी माफ करुन दिलासा द्यावे अशी मागणी स्विकृत नगरसेवक सचिन घोलप यांनी निवेदनाद्वारे नगराध्यक्ष व मुख़्याधिकारी यांच्याकडे केली आहे.
करमाळा प्रतिनिधी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात…
सांगोला प्रतिनिधी सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम परवाना व…
करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…
कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…
करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…