Categories: करमाळा

पारेवाडी रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाड्यांचा थांबा आणि पोमलवाडी ते चांडगाव दरम्यान पुलाचे मागणी बाबत खासदार. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे सोबत सकारात्मक चर्चा

करमाळा प्रतिनिधी रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याचे मागणी बाबत नुकताच एल्गार मोर्चा पार पडला. तसेच पोमलवाडी ता- करमाळा ते चांडगाव ता- इंदापुर दरम्यान उजनीचे पाण्यावर पुलाची निर्मिती व्हावी याकरीता मागणी जोर धरत असुन, यासाठी नुकतीच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची भेट घेतली. पारेवाडी रेल्वे स्थानकावर दोन ते तीन महिन्यात एक्सप्रेस गाडीला थांबा मिळेल अशी ग्वाही याप्रसंगी खासदारांनी दिली असुन, चांडगाव ते पोमलवाडी दरम्यानचे पुलामुळे मराठवाडा ते पश्चिम महाराष्ट्र हे भाग जोडण्यासाठीचा पर्यटन मार्ग होणार असुन यासाठी आपण निश्चित प्रयत्नशील राहुन मदत करणार असलेबाबत सांगितले. या महत्वपुर्ण चर्चेदरम्यान भारतीय जनता पक्षाचे बारामती व सातारा येथील पदाधिकारी देखिल उपस्थित होते. या चर्चेसाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे निवासस्थानी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुर्यकांत पाटील, बारामती येथील पुणे जिल्हा भाजयुमो चे माजी अध्यक्ष व भाजपा सहकार आघाडीचे शिवाजीराव निंबाळकर, साताराचे उद्योगपती सुरेंद्रजी काकडे, उद्योगपती व सातारा कुस्तीगीर संघाचे सचिव जीवनजी कापले, सोलापुर जिल्हा दुध संघाचे सदस्य राजेंद्रसिंह पाटील, केत्तुरचे माजी सरपंच ॲड. अजित विघ्ने. उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या चर्चेमुळे दोन्ही कामांबाबत सकारात्मक पाऊले उचलली जातील व महत्वांकाक्षी कामांमुळे विकासाला चालना मिळणार आहे. तसेच भविष्यात तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या पुलामुळे इंदापुर व शेजारील गावे देखिल पारेवाडी रेल्वे स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर येणार असुन, अनेक तरुणांना लोणी देवकर, इंदापुर येथील एमआयडीसी मधे सुलभतेने जाता येणार आहे. ऊसाचे वाहतुकीसह, पर्यटनाला संधी मिळणार असुन, शैक्षणिक व आरोग्याचे सुविधा देखिल तातडीने मिळणार आहेत. हा पुल झाल्यास इंदापुर ते संभाजीनगर चे अंतर हे केवळ१२५ किमी वर येणार असुन, शेतकऱ्यांचे शेतमालाला जवळच्या इंदापुर, बारामती, फलटण, अकलुज या बाजारपेठा उपलब्ध होणार आहेत. पोमलवाडी ते चांडगाव ला जोडणाऱ्या पुलाची सर्वात कमी लांबी असुन सध्या या ठिकाणी लाँच द्वारे वाहतुक होताना दिसते. या भागातील मासेमारीचा धंदा देखिल तेजीत असुन त्यांनाही मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. यासाठी पोमलवाडी, चांडगाव या ग्रामपंचायतीसह जवळपास वीस ते पंचवीस गावांचे ठराव देखिल निवेदना सोबत जोडलेले आहेत.

saptahikpawanputra

Recent Posts

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

1 day ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

1 day ago

पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांचा सहकुटुंब सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील‌ उद्योजक क्लासिक कंपनीचे ‌ मालक ‌ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…

2 days ago

निमगाव (ह )येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर अल्पदरात चष्म्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…

2 days ago

करमाळा एमआयडीसी मधील भूखंड वाटपास सुरुवात उद्योजकांनी लाभ घ्यावा जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी छोटे छोटे भूखंड उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आपण विशेष प्रयत्न केले असून उद्योग…

5 days ago