कुंभेज ता.करमाळा येथे आज जलजीवन मिशन योजनेतंर्गत पाणी पुरवठा योजना(रक्कम रुपये- 1 कोटी 59 लाख 50 हजार 417) व आमदार स्थानिक विकास निधी मधून मंजूर करण्यात आलेले साळुंखे वस्ती येथे तालीम बांधणे( रक्कम रुपये – 15 लाख) या कामांचे भूमिपूजन करमाळा -माढा विधानसभा मतदारसंघाचे आ.संजयमामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी लव्हे गावचे सरपंच मा.विलासदादा पाटील, महाराष्ट्र केसरी पै.मा.चंद्रहासबापू निमगीरे,पै.अनिल फाटके,पै.मा.अगस्ती मुटके,मा.महावीर आण्णा साळुंखे,ग्रा.पं.सदस्य,मा.आण्णा साळुंखे,वरकटणे गावचे सरपंच मा.बापू तनपुरे,कोंढेज गावचे मा.आप्पा आरणे,मा.रमेश गायकवाड,मा.नामदेव मुटके,मा.रावसाहेब सातव,मा.नितीन भोसले,मा.संतोष शिंदे,मा.आबा काटे,मा.रमेश काळे उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. संजयमामा शिंदे म्हणाले की ,विविध विकास कामे करत राहणे, वेगवेगळ्या योजनांना निधी आणणे या गोष्टीला आपले प्राधान्य असते. केलेल्या कामाचा गवगवा करणे, भूमिपूजन, उद्घाटन करणे, पाणी पूजन करणे याच गोष्टीला जर मी वेळ देत बसलो तर इतर विकास कामे राबविण्यासाठी आपल्याकडे वेळ राहणार नाही त्यामुळे मी अशा प्रसिद्धीच्या कामांना फाटा देत असतो .परंतु उद्घाटन दिसत नाहीत याचा अर्थ विकास थांबला असा होत नाही तर ज्या त्या गावांमध्ये …ज्या त्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर ती विकासकामे सुरू आहेत आणि त्यासाठी माझा सातत्याने पाठपुरावा सुरू असतो . कुंभेज साठीही रस्ते, पाणी, तालीम यासाठी मुबलक निधी उपलब्ध करून दिला असून भविष्य काळामध्ये कुंभेज या ठिकाणी सब स्टेशन झालेच पाहिजे या दृष्टीने माझे नियोजन सुरू आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विकास वीर यांनी केले तर आभार ग्रामपंचायत सदस्य अण्णा साळुंखे यांनी मानले.
चौकट –
*कुंभेज येथील तालमीतून सुसंस्कृत पैलवान तयार व्हावेत* …*गुंड नव्हे* – *महाराष्ट्र केसरी ,पै. चंद्रहास बापू निमगिरे*
(माजी सभापती)
मामांनी कुंभेज येथे तालमीसाठी जो 15 लाख निधी दिलेला आहे. या निधीमधून जी तालीम ऊभा राहील त्या तालमीमधून चांगले, आदर्श ,सुसंस्कृत असे पैलवानच घडावेत. यामधून गुंड घडू नये अशी अपेक्षा चंद्रहास बापू निमगिरे यांनी व्यक्त केली .कारण जेऊर आणि जेऊर पंचक्रोशीतील वेगवेगळ्या तालमीचा इतिहास हा गुंडाराज निर्माण करणे असाच आहे अशी ही खंत त्यांनी यावेळी बोलून दाखविली. पैलवानकी करणे याला सुद्धा आता वेगळे महत्त्व प्राप्त झालेले असून वेगवेगळ्या शासकीय नोकर भरतीमध्ये खेळाडूंना प्राधान्य दिले जाते. त्या दृष्टीने चांगले खेळाडू या तालुक्यात घडावेत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
*कुंभेज आणि पंचक्रोशीसाठी संजयमामांनी दिला कोट्यावधींचा निधी* – *अण्णा साळुंखे*.
आ.संजयमामा शिंदे यांच्याकडे आम्ही वर्षभरापूर्वी प्रवेश केला तेव्हापासून त्यांनी कुंभेज गावासाठी कोठ्यावधी रुपयांचा विकास निधी दिला असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य अण्णा साळुंखे यांनी दिली. यामध्ये जेऊर ते कुंभेज गुळसडी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्ता सुधारणा करणे – 4 कोटी ,कुंभेज – वरकटणे – साडे रस्ता सुधारणा करणे ( मुख्यमंत्री ग्रामसडक योजना ) – 13.50 कोटी , कुंभेज फाटा राष्ट्रीय महामार्ग ते विठ्ठल रुक्मिणी मंदिर कुंभेज गावठाण रस्ता सुधारणा करणे – 1 कोटी 90 लाख, जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना राबविणे 1 कोटी 59 लाख 50 हजार रुपये, आमदार फंडातून तालीम बांधणे 15 लाख रुपये असा जवळपास 16 कोटी रुपयांचा विकास निधी कुंभेज आणि पंचक्रोशी साठी आ. संजयमामा शिंदे यांनी दिल्यामुळे भविष्य काळामध्ये माझा गाव आणि माझी पंचक्रोशी आ.संजयमामा शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील असा विश्वास श्री साळुंखे यांनी व्यक्त केला.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…