भविष्यात पुनवर भागात कायमस्वरूपी पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असून हा भाग बागायती करणार आहे .जे करायचे आहे ते चांगल्या पद्धतीने करायचे आहे . तहान लागल्यावर विहीर खोदुन चालणार नाही तर त्यासाठी नियोजनबद्ध काम करावे लागणार आहे , त्यामुळे तालुक्यातील जनतेसाठी
विश्वासाने काम करणार असल्याचे प्रतिपादन आमदार संजयमामा शिंदे यांनी केले .
शुक्रवारी ७ एप्रिल रोजी सायंकाळी पुनवर तालुका करमाळा येथील उपसरपंच व 5 ग्रामपंचायत सदस्यांनी आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटात जाहीर प्रवेश केला . यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते .
यावेळी उपसरपंच रोहिदास जाधव , ग्रामपंचायत सदस्य बापूराव नरसाळे , बाळनाथ नरसाळे , पप्पू भिसे ,सागर लांडगे , राजेश ननवरे यांसह माजी सरपंच रामहरी जाधव नितीन जाधव , उमेश ननवरे , सुरेंद्र गोरे , संतोष शेळके , अनिल नरसाळे , कल्याण शेळके या कार्यकर्त्यांनी आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटात जाहीर प्रवेश केला . यावेळी माजी ता.पं.सदस्य, ॲड.मा.राहुल सावंत, माजी जि.प.सदस्य,मा.उध्दवदादा माळी, मांगी गावचे चेअरमन मा.सुजीततात्या बागल, पत्रकार मा.धनंजय मोरे, गावातील प्रमुख मा.अरुणबापू धुमाळ, पोलीस पाटील मा.बिभीषण नरसाळे, माजी सरपंच मा.दादासाहेब नरसाळे,मा.अशोनरसाळे,मा.अश्रुभाऊ शेळके,मा.सुग्रीव नरसाळे,मा.बाबासाहेब कोल्हे,मा.सचिन नरसाळे, प्रवेश केलेले सदस्य मा.बाळनाथ नरसाळे,मा.ज्ञानदेव भिसे,मा.उपसरपंच प्रतिनिधी मा.जगन्नाथ जाधव,मा.सागर लांडगे,मा.राजेश ननवरे,मा.बापूराव नरसाळे, कार्यकर्ते अनिल ( सर ) नरसाळे, अशोक ऊर्फ पिनू नरसाळे, मा.उमेश ननवरे,मा.नितीन ननवरे,मा.संतोष शेळके,मा.रामहरी जाधव,मा.कल्याण शेळके तसेच ग्रामस्थ व तरुण मित्र उपस्थित होते.यावेळी सुजित बागल म्हणाले की , पुनवर हे मजुरांचे गाव आहे , मांगी तलावात कायमस्वरूपी पाणी आले पाहिजे सुत्रसंचलन अविनाश शेलार यांनी केले
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…
करमाळा प्रतिनिधी छोटे छोटे भूखंड उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आपण विशेष प्रयत्न केले असून उद्योग…