करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात कै. आमदार .नामदेवराव जगताप यांचे कार्यकाळापासून सामाजिक चळवळीत काम करणारे आनंद कोठडीया यांनी वयाची नुकतीच 75 वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्यांच्या जेऊर येथील वादळ या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन आमदार संजयमामा शिंदे यांनी त्यांचा यथोचित सन्मान केला .
यावेळी आनंद कोठडीया सर आणि आ. संजयमामा शिंदे यांच्यामध्ये तालुक्यातील विविध प्रश्नावरती चर्चा झाली. यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य विलास दादा पाटील ,माजी सभापती चंद्रहास बापू निमगिरे ,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र कुमार बारकुंड ,माजी जिल्हा परिषद सदस्य उद्धव दादा माळी, सुजित तात्या बागल ,निळकंठ अभंग, उमेश पाथरूडकर,किरण डोके, विजय लबडे ,नानासाहेब साळुंखे, बालाजी गावडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते .
यावेळी करमाळा तालुक्यातील शेलगाव येथे ज्वारी संशोधन केंद्र कार्यरत आहे .त्या केंद्राच्या ठिकाणी केळी संशोधन केंद्र सुरू व्हावे या दृष्टीने प्रयत्न करणे संदर्भात आनंद कोठडीया यांनी आमदार शिंदे यांच्याकडे मागणी केली याविषयी भविष्य काळात निश्चितच आपण प्रयत्न करू असे आमदार शिंदे यांनी सांगितले. सुरुवातीला अभय लुंकड यांनी प्रास्ताविक केले.
*कोण आहेत आनंद कोठडीया*…
सामान्य शेतकरी केंद्रबिंदू मानून गेली ४३ वर्ष फक्त त्यांच्याच भल्यासाठी अविरतपणे कार्य करणारे…
सुखवस्तू कुटुंबात जन्म होऊनही कायम वंचित शोषित वर्गाचे दुःख कमी करण्यासाठी कार्य करणारे…
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ,प्राचार्य नरहर कुरुंदकर ,कॉम्रेड शरद पाटील ,प्रा .आ .ह.साळुंखे , डॉ.रावसाहेब कसबे यांच्या विचारांचा प्रभाव असणारे…
50 वर्षांपूर्वी एम. एस्सी ऍग्री असे शिक्षण असतानाही नोकरी किंवा व्यवसाय न करता पूर्णवेळ सामाजिक कार्य करणारे…
डॉ.कुमार सप्तर्षी ,डॉ.बाबा आढाव यांच्याकडून जन आंदोलनाची प्रेरणा घेत करमाळा तालुक्यासारख्या मागासलेल्या भागात सामाजिक कार्य करणारे…
कसलीही सरकारी मदत न घेता लोकविकास संस्थेच्या माध्यमातून शेती , शिक्षण ,पुनर्वसन, पाणलोट विकास ,वीज पुरवठा, ग्रामीण विकास इत्यादी क्षेत्रांमध्ये भरीव काम करणारे…
रोजगार हमी, पुनर्वसन, कृषी विस्तार यामध्ये मोठे काम करणारे…
पद्मश्री आप्पासाहेब पवार यांच्या सहयोग व प्रेरणेतून 30 वर्षांपूर्वी ठिबक सिंचन व पाणलोट क्षेत्रातही भरीव काम करणारे…
चौकट …
तुम्ही आमदार झाल्यामुळे मी पुण्याला चाललो – आनंद कोठडीया यांची मिश्किल टिप्पणी…
सर आपण कायमस्वरूपी जेऊर सोडत आहात असे का ? याविषयी आमदार संजयमामा शिंदे यांनी विचारले असता आनंद कोठडीया म्हणाले की ,तुम्ही आमदार झाल्यामुळे मला आता जेऊर येथे थांबण्याची आवश्यकता नाही. कारण कुकडी प्रकल्पांतर्गत पोंधवडी चारी चे काम ,मांगी तलावाला कुकडीचे पाणी मिळवण्याच्या दृष्टीने चाललेले प्रयत्न तसेच दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या अपूर्ण कामांना दिलेली गती, पाण्याचे समन्यायी वाटप, कोळगाव प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांना पर्याय जमीन मिळवण्याच्या दृष्टीने चाललेले प्रयत्न,तालुक्यातील सर्व गावांमध्ये विजेचे समान वितरण करण्याच्या दृष्टीने चालू असलेली सब स्टेशनची उभारणी, रस्त्याच्या पायाभूत सुविधा या कामामुळे आता करमाळा तालुक्यात मला काम करण्यासारखे काही उरलेच नाही. कै. नामदेवराव जगताप यांच्या पासून मी अनेक लोकआंदोलने उभा केली .सत्तेवरती अंकुश ठेवून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला ,परंतु यापैकी काहीही न करता तुम्ही रस्ते, पाणी, वीज या कामांमध्ये अग्रेसर आहात. त्यामुळे मी करमाळा तालुका सोडून जात असताना समाधानी आहे. तुमच्या माध्यमातून करमाळा तालुक्याला कै. नामदेवराव जगताप यांच्या नंतर एक दूरदृष्टी असलेला, व्हिजन असलेला लोकप्रतिनिधी लाभल्याचे समाधान आहे अशी भावना कोठडीया यांनी व्यक्त केली.
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…
करमाळा प्रतिनिधी छोटे छोटे भूखंड उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आपण विशेष प्रयत्न केले असून उद्योग…