करमाळा प्रतिनिधी- मातंग एकता आंदोलन करमाळा शहर या संघटनेच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खुली whatsapp निबंध स्पर्धा चे आयोजन केले आहे. ही स्पर्धा आपण आपल्या घरीच बसून महात्मा फुले व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वर एका विषया वर लिहून Whatsapp करावा.
विषय
*महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य*
*महात्मा फुले यांची सत्यशोधक चळवळ,*
*डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाही*
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महिला व ओबीसीं साठी कार्य*
हे विषय असून निबंध पाठवण्याची दिनांक १० एप्रिल ते १५ एप्रिल असा कालावधी आहे. विजेत्यांना बक्षिसे
*प्रथम बक्षीस १०००/-*
मा. यशपाल दादा कांबळे आरपीआय यु.जिल्हाध्यक्ष
यांच्या तर्फे तर
*द्वितीय बक्षीस ७०० /- रूपये*
मा. रामभाऊ वाघमारे मातंग एकता आंदोलन चे जिल्हाध्यक्ष यांच्या कडून व
*तृतीय बक्षीस ५००/-* मा. सुहास ओहोळ सामाजिक कार्यकर्ते
यांचे तर्फे असून प्रमाणपत्र संयोजन शरद पवार मातंग एकता आंदोलन ता.अध्यक्ष यांनी केले
बक्षीस समारंभ १६ एप्रिल रोजी साय ६ वा. स्थळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक करमाळा येथे कार्यक्रमाचे मार्गदर्शक नागेश दादा कांबळे यांच्या शुभहस्ते देण्यात येणार आहे.या कार्यक्रमाचे आयोजन मातंग एकता आंदोलन चे शहराध्यक्ष युवराज जगताप यांनी केले .
टिप.
Whatsapp No 72762 33783 वर निबंध हा फक्त ४०० शब्दामध्ये कागदावर लिहून त्याचा फोटो पाठवावा.
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…
करमाळा प्रतिनिधी छोटे छोटे भूखंड उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आपण विशेष प्रयत्न केले असून उद्योग…