करमाळा प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विचाराने प्रभावित होऊन भाजपमध्ये प्रवेश केला असल्याची प्रतिक्रिया नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले नितीनभाऊ झिंजाडे यांनी दिली आहे.प्रवेशाबद्दल अधिक बोलताना ते म्हणाले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच नेतृत्व आता सामान्य जनतेने मान्य केले असून लोकांसाठी त्यांनी अनेक निर्णय घेतले असून पक्षामध्ये सामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याचे काम केले आहे.सामान्य परंतु लोकांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्याला भाजपमध्ये भवितव्य आहे.यामुळे आपण प्रमुख पदाधिकारी यांचेसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तालुक्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे हे आपले जुने सहकारी असून आम्ही बजरंग दल संघटनेत सोबत काम केले आहे.गणेश चिवटे यांनी शून्यातून काम उभे करून आज ते एक उद्योजक म्हणून यशस्वी झाले आहेत यासोबतच आज भाजप खेड्यापाड्यात नेण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांची तालुक्यातील ताकत आणखी वाढवण्यासाठी आपण चिवटे यांच्या यांच नेतृत्व मान्य करून त्यांच्यासोबत भाजपची ताकत तालुक्यात वाढवणार आहोत असेही झिंजाडे यांनी शेवटी सांगितल आहे.
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…
करमाळा प्रतिनिधी छोटे छोटे भूखंड उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आपण विशेष प्रयत्न केले असून उद्योग…