करमाळा प्रतिनिधी आगामी आदिनाथ व मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सर्व गटातटाच्या नेत्यांनी एकत्र येऊन आपल्या गटातील अनुभवी लोकांना संचालक म्हणून निवड करून आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करावी असे मत दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामदास झोळ सर यांनी व्यक्त केले. करमाळा येथे शासकीय विश्रामगृह येथे करमाळा तालुका पत्रकार संघाच्यावतीने दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामदास झोळ सर यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या सत्कार कार्यक्रमास पत्रकार नासिर कबीर, दिनेश मडके,आशपाक सय्यद बाळासाहेब भिसे सर अण्णा काळे जयंत दळवी अशोक मुरूमकर सचिन जव्हेरी,शितल कुमार मोटे, सुहास घोलप,सिद्धार्थ वाघमारे नागेश चेंडगे,विशाल परदेशी काँग्रेस ओबीसी तालुकाध्यक्ष गफूर शेख श्रीकांत साखरे पाटील उपस्थित होते. यावेळी वाढदिवसाच्या सत्काराला उत्तर देताना म्हणाले की आदिनाथ सहकारी साखर कारखाना चालू करण्यासाठी आम्ही बचाव समितीचे माध्यमातून न्यायालयीन लढ्यापासून कारखाना चालू करण्यासाठी प्रयत्न केले नामदार तानाजी सावंत यांच्या सहकार्यामुळे कारखाना सुरू झाला कारखाना सुरू झाल्यानंतर यशस्वी गाळपही झाले. परंतु कारखान्याची निवडणूक लागली म्हणाले की प्रत्येकाने श्रेयवादाची लढाई सुरू केली करमाळा तालुक्याचे राजकारण आदिनाथ साखर कारखान्यावर अवलंबून असल्याने प्रत्येकजण आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे .परंतु आदिनाथ साखर कारखाना शेतकरी सभासदाचे सहकाराचे मंदिर असून केवळ राजकारणापुरता विचार न करता तालुक्यातील शेतकऱी बांधवांच्या हितासाठी कारखान्याचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आपण निवडणूक न लादता बिनविरोध करावी बचाव समितीचा आपणास पाठिंबा राहील असे ते म्हणाले करमाळा तालुका शैक्षणिक दृष्टीने मागास आहे. राजकारणात सुसंस्कृत माणूस येणे दूर पास्त झाले आहे करमाळा तालुक्यामध्ये शैक्षणिक संकुल उभा करण्याचा आपला मानस असून करमाळा शहरालगत वीस पंचवीस एकर जागा मिळाल्यास सर्व सोयीनीयुक्त संकुल आपण उभा करणार आहे करमाळा तालुक्याच्या राजकारणाच्या बाबतीत बोलायचे झाले तर आतापर्यंत गटातटाचे राजकारण या तालुक्यात चालत आले आहे. गटातटाच्या राजकारणामुळे पारंपारिक लोकच राजकारणात सक्रियपणे सहभाग घेत आहे विकासाची दृष्टी असलेली सुसंस्कृत माणसे राजकारणापासून अलिप्त राहिल्याने करमाळा तालुक्याचे विकास कुठला आहे. पक्षीय राजकारणाचा विचार केला तर येथे कुठलीही पक्षाचा एक ठाम विचार नसल्याने राजकीय पक्षानेही करमाळा तालुक्याच्या विकासाच्या बाबतीत दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे विकास तर सगळ्यांना पाहिजे पण विकासासाठी चांगली माणसे एकत्र येत नाही आली तर ती स्वार्थामुळे टिकत नाही अशी परिस्थिती करमाळा तालुक्याची झाली आहे. करमाळा तालुक्याच्या राजकारणामध्ये लोकांचा2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या वतीने तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी माझ्याशी संपर्क करून विधानसभा लढवण्याची ऑफर दिली होती. दरम्यानच्या काळात शेवटच्या पंधरा दिवसात घडलेल्या घडामोडीमुळे राष्ट्रवादीने पर्याय बदलला मात्र येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीत परिस्थिती निर्माण झाली तर निवडणूक लढविण्याचा विचार करू सहभाग मिळाल्यास तसेच त्यांचे पाठबळ मिळाले तर आपण आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती आदिनाथ सहकारी साखर कारखाना मकाई कारखाना त्याचबरोबर पक्षाने व लोकांनी संधी दिल्यास योग्य वेळी विधानसभेचाही विचार करणार असल्याचे सांगितले. लोकांनी पाहिजे तसे पाठबळ देऊन आपल्याला साथ दिली तरच राजकारणाच्या बाबतीत आपण पुढील पाऊल टाकून वाटचाल करणार आहोत नाहीतर आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य करण्याचा मानस असल्याचे प्राध्यापक रामदास झोळ सर यांनी सांगितले आहे.