करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील कमला भवानी बहुउद्देशीय संस्था करमाळा संचलित सुरताल संगीत विद्यालयाच्या वतीने शास्त्रीय संगीत गायन व तबला वादन या विषयाची कार्यशाळा घेण्यात येणार आहे. हा प्रशिक्षण सोहळा दिनांक 16 एप्रिल 2023 रोजी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे विजयश्री सभागृहाच्या हाॅल मध्ये सकाळी नऊ ते पाच या वेळेत संपन्न होणार आहे. मार्गदर्शक म्हणून कोलकत्ता येथील प्रसिद्ध शास्त्रीय युवा गायिका आद्रीजा बसू आणि पुणे येथील प्रसिद्ध युवा तबलावादक सुखशांत पाटील हे उपस्थित राहणार असून व्याख्यान आणि प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून शास्त्रीय संगीत, गायन, तसेच तबला विषयाचे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणूनविद्या विकास मंडळाचे सचिव मा श्री विलासराव घुमरे , यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री गणेश भाऊ करे पाटील, सौ सुनीता देवी मॅडम, डॉ. सौ प्रचिती पुंडे मॅडम (वुमन मिसेस युनिव्हर्स), कोमल ताई घुमरे, शितलताई करे पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत . यावेळी सदर कार्यक्रमादरम्यान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असुन यामध्ये डॉ प्रचिती पुंडे (पुणे) यांना सुरताल करमाळा भूषण पुरस्कार, आद्रीजा बसू (कोलकत्ता) यांना सुर सरस्वती पुरस्कार तर सुखशांत पाटील (पुणे) यांना बाबुराव महाराज तालश्री पुरस्कार देण्यात येणार आहे. या कार्यशाळेसाठी सोलापूर, पुणे, बीड व धाराशिव जिल्ह्यातील शंभराहून अधिक प्रशिक्षणार्थी सहभागी होणार आहेत. अशी माहिती विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष मा श्री बाळासाहेब नरारे यांनी दिली आहे.